चंद्रपूर जिल्ह्यात राजकीय तस्करांची पत्रकाराला धमकी

चंद्रपूर जिल्ह्यात राजकीय तस्करांची पत्रकाराला धमकी

 Crime district chandrapur

चंद्रपूर/कोरपना - चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून राजकीय रेती व मुरूम तस्करांचा हैदोस वाढला आहे, आपल्या राजकीय वरदहस्ताचा वापर करीत नेते खनिज संपत्तीची चोरी करायला लागले आहे.

Sand mafia chandrapur district


3 जुलै ला कोरपना येथील मामा तलाव जवळून रात्रीच्या सुमारास ट्रॅक्टर ची वाहतूक सुरू होती, साहजिकच आहे त्यामध्ये रेती किंवा गौण खनिज असेल, त्यावेळी पत्रकार मोहब्बत खान तिथून जात असताना ट्रॅक्टर ची वाहतूक बघत त्यांनी तहसीलदार व्हटकर यांना कॉल लावला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

चंद्रपुरात स्वीय सहायकाच्या कानशिलात लगावली


त्या तस्करीचा पुरावा म्हणून मोहब्बत खान यांनी व्हिडीओ शूटिंग सुरू केले मात्र त्यावेळी पियुष कावरे त्याठिकाणी आला व इथून तात्काळ निघून जा असा दम दिला. त्यानंतर नितीन बावणे, नगरपंचायत कोरपना चे उपाध्यक्ष इस्माईल रसूल शेख, पंकज बावणे व धीरज चन्ने यांनी मोहब्बत ला शिवीगाळी करीत धक्काबुक्की करीत धमकी दिली.

या सर्व राजकीय तस्करांनी मोहब्बत ला धमकी देत अधिकारी आमच्या खिशात आहे, तू इतका मोठा पत्रकार नाही आमचं काही बिघडवायला असा दम त्यांनी मोहब्बत ला दिला.

कोरपना तालुक्यात अनेक वर्षांपासून कांग्रेसचे वर्चस्व आहे, त्या वर्चस्वाचा फायदा या प्रकारे होत असून आता पत्रकारांना सुद्धा विरोधात आवाज उचलला की त्याला दाबण्याचा प्रयत्न राजकीय पुढारी करीत आहे.

मात्र मोहब्बत यांनी त्यांच्या धमकीला भीक न घालत थेट कोरपना पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, पोलिसांनी नितीन बावणे, इस्माईल शेख, पंकज बावणे, धीरज चन्ने व पियुष कावरे यांच्यावर भारतीय दंड संहिता 1860 कलम 143, 294, 352 व 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला.

चंद्रपुरात 100 पेटी दारू पकडली, आरोपी अटकेत मात्र नाव गोपनीय


याबाबत कोरपना पोलीस स्टेशनच्या तपास अधिकाऱ्यांना अधिक माहिती मागितली असता सदर तक्रार आमच्याकडे आली होती, आम्ही विविध कलमांव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

कोरपना चे तहसीलदार प्रकाश व्हटकर यांना सदर रेती व गाऊन खनिज तस्करीबाबत सम्पर्क केला असता त्यांचा सम्पर्क होऊ शकला नाही.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने