राष्ट्रवादी कांग्रेसच्या माजी नगरसेवकाची हत्या

राष्ट्रवादी कांग्रेसच्या माजी नगरसेवकाची हत्या

Pune murder
पुणे - राष्ट्रवादी कांग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय माजी नगरसेवक महेबूब पानसरे यांची कुऱ्हाड व कोयत्याने वार करीत हत्या करण्यात आली.

murder ncp corporator pansare
mahebub pansare


पानसरे हे जेजुरी नगरपालिकेचे माजी नगरसेवक होते, त्यांच्या हत्येने जेजुरी परिसर हादरुन गेला, याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

घटना काय?

नाझरे धरण परिसरात पानसरे यांची शेती आहे, शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास पानसरे हे शेतीच्या मशागतीचे काम बघण्यासाठी आपल्या सहकाऱ्यासमवेत गेले होते, पानसरे यांचा शेतीचा जुना वाद सुरू होता, त्यावेळी वनेश परदेशी हे तिथे पोहचले दोघांमध्ये वाद सुरू झाला, मात्र सदर वाद हा विकोपाला गेला.
वनेश परदेशी सोबत त्याचे मूल व इतरांनी पानसरे यांच्यावर कोयता व कुऱ्हाडीने वार केले, रक्ताच्या थारोळ्यात पानसरे खाली कोसळले, या हल्ल्यात पानसरे गंभीर जखमी झाले होते.
जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले मात्र अति रक्तस्त्रावाने पानसरे यांचा मृत्यू झाला.
किरण वनेश परदेशी, वनेश प्रल्हाद परदेशी, स्वामी वनेश परदेशी व इतर संशयितांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने