चंद्रपूर शहरात 21 लाखांची देशी दारू जप्त

चंद्रपूर शहरात 21 लाखांची देशी दारू जप्त

Chandrapur police

चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी उठविल्यावर जिल्ह्यात मद्याचे असंख्य दुकाने सुरू झाली मात्र त्यानंतर आजही ग्रामीण भागात दारूचा अवैध पुरवठा होत आहे, पोलिसांनी याआधी अवैध दारू वाहतुकीच्या केसेस केल्या आहे, ही तर झाली ग्रामीण भागातील स्थिती चंद्रपूर शहरात तब्बल 100 संत्रा देशी दारूच्या पेट्या पोलिसांनी जप्त केल्या.

chandrapur local crime branch
आरोपीसहित व स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचारी


स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर च्या चमूला गोपनीय माहिती मिळाली होती की गजानन महाराज मंदिराजवळ 2 संशयित वाहन क्रमांक MH14DN7569 व MH02BY8154 उभे असल्याची, माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन वाहनांची तपासणी केली असता वाहनात तब्बल 100 पेट्या देशी दारूचे बॉक्स पोलिसांना आढळले.
पोलिसांनी 2 इसमाना ताब्यात घेतले, ती दारू कुठे जाणार होती? कुठून आणली याबाबत काहीही माहिती मिळाली नाही.



विशेष म्हणजे आरोपीचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे पोलीस विभागाने 2 वाहन व आरोपी यांचा फोटो मात्र पत्रकारांना दिला. आरोपींचे नाव काय याबाबत अधिकारी व पोलीस अधिक्षकांशी सम्पर्क साधला असता काही वेळात नाव सांगतो असे सांगण्यात आले.
आरोपींचे नाव न सांगणे हा तपासाचा महत्वपूर्ण भाग असू शकतो यात शंका नाही.

या गुन्ह्यात 2 वाहन व देशी दारूचे 100 बॉक्स असा एकूण 21 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सपोनि जितेंद्र बोबडे, पोउपनी विनोद भुरले, पोलीस कर्मचारी संजय आतकुलवार, संतोष एलपुलवार, नितीन रायपूरे, नितीन पंधरे, कुंदनसिंग बावरी, गोपाल आतकुलवार, नरेश डाहूले व प्रांजल झिलपे यांनी केली.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने