सांगितलं तरीही ऐकत नाही

सांगितलं तरीही ऐकत नाही

Chandrapur crime news

चंद्रपूर - चंद्रपुर जिल्ह्यात अधिकृत दारूविक्री 2 वर्षे आधी करण्यात आली मात्र त्यानंतर ही जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही अवैध दारूविक्री सुरूच आहे.

illegal liquor smuggelr
अवैध दारूविक्रेत्याला गावकऱ्यांनी पकडले


चंद्रपुरातील मोरवा येथील नागरिकांनी मिळून अवैध दारूची तस्करी करणाऱ्याला पकडले असून दुचाकीमधून काही प्रमाणात दारू जप्त केली आहे.

आनंदराव राऊत असे दारू विक्रेत्याचे नाव आहे. एक इसम दुचाकीत अवैध दारू घेऊन येत असल्याची माहिती नागरिकांना मिळाली होती. त्यानंतर गावातील नागरिकांनी एकत्र येत रेल्वे गेट जवळ आरोपीला पकडून दुचाकीची झडती घेतली असता दुचाकीत दारू आढळून आली.
आरोपीने दुचाकी वाहन क्रमांक MH34AU8593 च्या डिक्कीत इंग्लिश दारू विकत असल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली होती.


या संपूर्ण घटनेची माहीती पडोली पोलिसांना देण्यात आली. त्यांनतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन आरोपीला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. तसेच दारू जप्त केली.यावेळी सरपंचा स्नेहा साव, उपसरपंच भूषण पिदूरकर,मुकेश अतकरी, प्रशांत घोरुडे, सचिन साव, अजय कोवे, मुना पिदूरकर,नितीन साव, पोलीस पाटील नरेंद्र डोर्लिकर रवींद्र तितरे यांच्यासह गावकऱ्यांची उपस्थिती होती.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने