राजुरा शहरात अंधाधुंद गोळीबार

राजुरा शहरात अंधाधुंद गोळीबार

Chandrapur firing news

चंद्रपूर / राजुरा - जिल्ह्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असल्याने चंद्रपूर गुन्हेगारीचा हब बनत आहे, पोलिसही या गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यास अपयशी ठरत आहे.
कांग्रेस नेते संतोष रावत यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असताना पुन्हा जिल्ह्यात गोळीबाराची घटना घडली आहे.

Firing in rajura
गोळीबार




राजुरा शहरातील सोमनाथ पूर वार्ड मधील भाजपा युवा मोर्चा चे जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांच्या घरी अज्ञात व्यक्तीने गोळी बार केला, यात सचिन डोहे यांची पत्नी पूर्वाशा सचिन डोहे वय 27 यांचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी आहे.


लल्ली शेरगील हे या गोळीबारात जखमी झाले आहे, सदर गोळी बार कोळसा तस्करीतून झाले असल्याचे बोलल्या जात आहे. सोमनाथपूर येथे लल्ली शेरगील यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी गोळी बार केला तो सचिन डोहे यांच्या घरा कडे धावत गेला मारेकरी त्याच्या मागे धावले एवढ्यात सचिन यांच्या घराच्या गेट वर दोन गोळ्या झाडल्या.


लल्ली शेरगील याना दोन गोळ्या लागल्या तेवढ्यात सचिन ची पत्नी घरातून बाहेर निघाली असता तिला दोन गोळ्या लागल्या, गंभीर अवस्थेत दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी पूर्वशा डोहे हिला मृत घोषित केले. या घटनेत काही कारण नसताना पूर्वशा यांचा मृत्यू झाला, सध्या या घटनेमुळे राजुरा शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
पूर्वशा ह्या भाजयुमो चे जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांच्या पत्नी आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने