चंद्रपुरातील माजी नगरसेवकाने खेळला जुगाराचा डाव

चंद्रपुरातील माजी नगरसेवकाने खेळला जुगाराचा डाव

Chandrapur crime news
चंद्रपूर - जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून गुन्हेगारी वाढत आहे, वाढत्या गुन्हेगारीवर पोलीस प्रशासन नियंत्रण आणण्याचे प्रयत्न करीत आहे.
वाढत्या गुन्हेगारीत आता राजकीय व्यक्ती उडी घेऊ लागले आहे.

chandrapur gambling crime
स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व पडोली पोलीस अधिकारी


चंद्रपूर शहरात असा प्रकार उघडकीस आला आहे, शहरातील एकोरी वार्ड प्रभागातील माजी नगरसेवक करीमलाला काजी हे अनेक दिवसांपासून आपल्या मालकीच्या भंगार दुकानाच्या बाजूला जुगार भरवीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.
माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी पथकासह छोटा नागपूर परिसरातील भंगार दुकानाजवळील बंद खोली धाड मारली.

या धाडीत तब्बल 17 जुगार बहाद्दर यांच्यावर कारवाई करण्यात आली, सोबत 37 हजार रुपये रोख, 12 मोबाईल, 7 मोटारसायकल व 52 पत्ते असा एकूण 5 लाख 59 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची यशस्वी कारवाई पोउपनी जनगमवार, कैलास, किशोर, धीरज, प्रतीक, स्थानिक गुन्हे शाखेचे सुधीर मत्ते, मनोहर रामटेके, सुरेंद्र महातो, दीपक डोंगरे, गणेश भोयर, गोपीनाथ मरोटे व प्रदीप मडावी यांनी केली.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने