YouTube Channel subscribe करा आणि पैसे कमवा

YouTube Channel subscribe करा आणि पैसे कमवा

YouTube channel subscribe new cyber crime

नागपूर - youtube चॅनेल सबस्क्राइब करा व पैसे कमवा आजकाल असे संदेश अनेकांच्याया मोबाईलवर येत आहे, नागरिक पैसे कमविण्याच्या नादात अश्या संदेशाला बळी पडत आहे.


प्रतिकात्मक फोटो
सायबर गुन्हेगारीला बळी पडू नका


काही दिवसांपूर्वी अश्या घटना पुणे भागात घडल्या होत्या, आता नागपुरात अशीच घटना उजेडात आली आहे.

गिट्टी खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत फुटवेअर दुकान संचालक 29 वर्षीय अंकित बदानी यांच्या मोबाईलवर Youtube channel subscribe करून पैसे कमवा असा मॅसेज आला, अंकित त्या संदेशाला बळी पडला, त्याने चॅनेल सबस्क्राइब केले व त्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट संबंधित मोबाईलवर पाठविला, आधी अंकित ला पुढून आर्थिक लाभ झाला.

त्यामुळे अंकित चा विश्वास पुढच्या व्यक्तीने संपादन केला, पुढे अंकित ला या व्यवसायात गुंतवणूक केल्यास लाखो रुपये मिळतील असा प्रस्ताव देण्यात आला, आणि अंकित त्या प्रस्तावाला बळी पडला, त्यासाठी पैसे जमा करावे लागतील अशी अट अंकित पुढे ठेवली.

अंकित ने वेगवेगळ्या खात्यात 3 लाख 7 हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले मात्र त्याला कसलाही आर्थिक लाभ झाला नाही, व त्याच्या समोरील व्यक्तीने फोन उचलणे बंद केले, आपली फसवणूक झाली हे लक्षात येताच त्याने पोलीस स्टेशन गाठत अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार नोंदविली.

चॅनेल सबस्क्राइब करून 50 रुपये कमवा या संदेशाला अंकित बळी पडला आणि त्या नादात 3 लाख रुपये गमावून बसला, जर कुणाला असा मॅसेज मोबाईल वर आल्यास त्यांनी कसलाही प्रतिसाद देऊ नये असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने