पत्रकारांवर अज्ञात हल्लेखोराने केला गोळीबार

पत्रकारांवर अज्ञात हल्लेखोराने केला गोळीबार

Pune crime story's
पुणे - एका दैनिकात काम करणारे उपनगर पत्रकारांवर दोन अज्ञातांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.



रविवारी रात्री पत्रकार 34 वर्षीय हर्षद कटारिया हे महर्षिनगर परिसरातून घरी जात होते, सोसायटी जवळ पोहचताच दुचाकीवर आलेल्या 2 अज्ञातांनी हर्षद वर मिरची पूड टाकीत गोळीबार केला मात्र ऐनवेळी ते वाकल्याने हल्लेखोरांचा नेम चुकला.

याआधी सुद्धा हर्षद वर असे जीवघेणे हल्ले झाले होते, पत्रकारितेसह त्यांनी माहिती अधिकार अंतर्गत अवैध इमारतीवर बुलडोजर चालविण्याचे काम सुद्धा केले आहे.

याबाबत हर्षद यांनी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला, पोलिसांनी गुन्हा दाखल करीत अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला आहे, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन अज्ञात हल्लेखोर कैद झाले आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने