प्रेमाला अल्पवयीन मुलीचा नकार, युवकाने उचलले धक्कादायक पाऊल

प्रेमाला अल्पवयीन मुलीचा नकार, युवकाने उचलले धक्कादायक पाऊल

Chandrapur crime news

चंद्रपूर - देशात सध्या लिव्ह इन रिलेशन व एकतर्फी प्रेम संबंधातून अनेक क्रूर घटना घडत आहे, विशेष बाब म्हणजे या सर्व घटना मेट्रो सिटी मध्ये घडलेल्या आहे मात्र आता ग्रामीण भागातही अश्या घटना घडायला लागल्या आहे.



चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात असलेले बेलगाव येथे 14 वर्षीय अल्पवयीन मुलीने प्रेमाला होकार न दिल्याने 22 वर्षीय युवकाने त्या मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला मात्र वेळीच मुलीच्या कुटुंबाने धाव घेतल्याने अनर्थ टळला.


12 जून सोमवारी बेलगाव येथे 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला त्याच गावातील 22 वर्षीय सिद्धांत भेले या युवकाने प्रेमासाठी प्रपोज केले मात्र त्या मुलीने सरळ सिद्धांत च्या प्रेमाला नकार दर्शविला, यावर सिद्धांत चिडला व त्याने एका बॉटल मध्ये पेट्रोल घेत मुलीच्या घरी जाऊन तिच्या अंगावर पेट्रोल टाकले, अचानक झालेल्या या प्रकाराने मुलगी घाबरली तिने आरडाओरडा केला असता मुलीच्या कुटुंबियांने तात्काळ मुलीकडे धाव घेतली.
कुटुंबाने तात्काळ मुलीला बाजूला केल्याने मोठा अनर्थ टळला.


घडलेला सर्व प्रकार कुटुंबाला सांगितला असता आई-वडिलांनी मुलीला सोबत नेत भद्रावती पोलीस स्टेशन गाठत सिद्धांत च्या विरोधात तक्रार दिली.
पोलिसांनी 13 जून मंगळवारी आरोपी सिद्धांत अटक केली, आरोपीवर कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी युवकाला न्यायालयात उभे केले असता त्याला गुरुवार 15 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार बिपीन इंगळे करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने