सीसीटीव्ही ला वाकोल्या दाखवीत चंद्रपुरात घरफोड्या

सीसीटीव्ही ला वाकोल्या दाखवीत चंद्रपुरात घरफोड्या

Chandrapur crime story

चंद्रपूर - शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटनेत वाढ होत असून सदर घटनेवर आळा बसावा यासाठी पोलिसांनी अनेकदा नागरिकांना सीसीटीव्ही लावण्याचे आवाहन केले होते मात्र शहरातील उच्चभ्रू वसाहतीत चारही बाजूने सीसीटीव्ही कॅमेरे असतांना सुद्धा तब्बल 5 घरी घरफोडीची घटना घडली आहे.



चंद्रपूर शहरातील दाताला रोडवरील कोसारा नवीन चंद्रपूर मधील सिनर्जी वर्ल्ड या वसाहतीमध्ये तब्बल 100 कुटुंबे राहतात, मात्र उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने अनेकजण बाहेरगावी गेले होते, या संधीचा फायदा घेत अज्ञातांनी डाव साधला.

याबाबत फिर्यादी यांनी मंगळवारी रामनगर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार नोंदविली, उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने काही कुटुंब बाहेरगावी गेली होती, त्यादरम्यान सिनर्जी वर्ल्ड टाऊनशीप मधील 5 घरात अज्ञातांनी प्रवेश करीत तब्बल 19 तोळे सोनं, 2 लाख रुपयांची रोकड व जवळपास अडीच किलो चांदी चोरी केली.

घटनेनंतर फिर्यादी जय नामदेव, किशोर राऊत, मनोज सिद्धीमशेट्टीवार, सिद्धार्थ फुलझेले, मोहम्मद निषाद यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्यावर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.
घटनास्थळाचा पंचनामा केल्यावर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, त्यामध्ये चोरटे कॅमेऱ्यात कैद झाले मात्र त्यांनी चेहरा कपड्याने झाकला असल्याने त्यांची ओळख सध्या पटलेली नाही.
सदर वसाहतीमध्ये कुटुंब सुट्टीत गावी गेले असतांना चोरट्यानी त्या परिसरातील रेकी केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, मात्र एकाच दिवशी 5 घरी घरफोडी ची घटना घडल्याने पोलिसही अवाक झाले आहे.
सध्या या प्रकरणाचा तपास रामनगर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध प्रमुख सपोनि हर्षल एकरे व चमू करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने