चंद्रपूर शहरातून 10 चाकी ट्रकची चोरी

चंद्रपूर शहरातून 10 चाकी ट्रकची चोरी

Chandrapur crime

चंद्रपूर - सध्या जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असून ते रोखण्यास पोलीस प्रशासन सुद्धा अपयशी ठरत आहे.



खून, दरोडे, विनयभंग, मारहाण व प्राणघातक हल्ले या गुन्ह्यात वाढ झाली असून 9 जून ला चंद्रपूर शहरातील मालधक्का परिसरातून 10 चाकी ट्रक चोरी केल्याची घटना घडली.

9 जून ला रात्री मालधक्का परिसरात वाहन चालक गिरीश शुक्ला यांनी ट्रक क्रमांक MH34AB3253 रात्री 8.30 वाजताच्या सुमारास ठेवला होता, मात्र सकाळी तो ट्रक न दिसल्याने त्याचा आजूबाजू शोध घेतला असता तो कुठेही आढळून आला नाही, याबाबत शुक्ला यांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदविली असून पुढील तपास सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने