इतवारी रेल्वे स्टेशनवर अपहरणाचा थरार

इतवारी रेल्वे स्टेशनवर अपहरणाचा थरार

Nagpur crime news

नागपूर - पश्चिम बंगाल मधील एक गृहस्थ आपल्या 3 वर्षाच्या मुलीसह इतवारी रेल्वे स्थानकावरील तिकीट काऊंटर वर होते, वडिलांचे लक्ष मुलीकडे नसल्याचे समजताच एकाने मुलीला आमिष दाखवीत तिचे अपहरण केले, मात्र रेल्वे पोलिसांनी तत्परता दाखवीत अवघ्या 3 तासात आरोपीला अटक करीत मुलीची सुटका केली.




इतवारी रेल्वे स्थानकावर पश्चिम बंगाल येथे राहणारे गृहस्थ आपल्या मुलीसह तिकीट काऊंटर वर तिकीट काढण्यासाठी गेले होते, वडील तिकीट काढत असताना मुलगी बाजूला खेळत होती, याचा डाव साधून एकाने त्या मुलीला आमिष दाखवीत तिथून पळ काढला.

वडिलांचे लक्ष गेल्यावर त्यांना मुलगी कुठे दिसली नाही त्यांनी सर्वत्र मुलीचा शोध घेतला मात्र ती कुठेही आढळून आली नाही, मुलगी बेपत्ता झाल्याचे समजताच त्याबाबत वडिलांनी रेल्वे पोलिसांशी सम्पर्क साधत त्यांच्याकडे तक्रार दिली.

रेल्वे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. आरोपी सीसीटीव्हीत मुख्य रेल्वेस्थानकाच्या दिशेने पळून गेल्याचे दिसून आले. दरम्यान अपहृत मुलगी आरोपीसह मुख्य रेल्वेस्थानकावर सापडली. मुलीची सुखरूप सुटका करून तिला कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने