चंद्रपुरात अल्पवयीन मुलाची हत्या

चंद्रपुरात अल्पवयीन मुलाची हत्या

Chandrapur murder news

चंद्रपूर - शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनेत वाढ होताना दिसून येत आहे, 4 दिवसांपूर्वी क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या वादात अल्पवयीन मुलाने एकाच्या डोक्यावर बॅट ने वार करीत त्याची हत्या केली, 4 दिवसांनी हे प्रकरण चंद्रपूर पोलीस स्टेशनमध्ये गेल्याने याबाबत पोलिसांचा तपास सुरू झाला आहे.



नेमकं प्रकरण काय?

4 दिवसांपूर्वी शहरातील बगडखिडकी परिसरात काही मुले क्रिकेट खेळण्यात व्यस्त होते, खेळ म्हटला की वादावादी होणारचं, मात्र या वादात एक खुनी संघर्ष घडला.

खेळण्यावरून दोन गटात वाद झाला आणि वादाचे रूपांतर हाणामारीत झाले, यामध्ये एका अल्पवयीन मुलाने दुसऱ्या अल्पवयीन मुलाच्या डोक्यावर बॅट ने वार केला, तो मुलगा अचानक झालेल्या वाराने जमिनीवर कोसळला, त्याला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र दुसऱ्या दिवशी उपचार सुरू असताना त्या मुलाचा मृत्यू झाला.

4 दिवस तक्रार दाखल नाही

मुलगा मरण पावला, पण त्याचा दोष कुणाला द्यायचा? याबाबत घरचे कुटुंब बुचकाळ्यात पडले, 
मात्र परिसरात मृतक मुलाच्या कुटुंबाची बदनामी सत्र सुरू झाले, तक्रार न करण्यासाठी पीडित कुटुंबाने पैसे घेतले असा आरोप झाला असता मृतक मुलाच्या आईने 6 जून ला चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात मुलाच्या हत्येबाबत तक्रार नोंदविली.

गुन्हा दाखल आता?

गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला असून मृतक मुलाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे, सर्व कायदेशीर बाबीची पूर्तता झाल्यावर आज पुरलेला मृतदेह काढून त्याचं शवविच्छेदन होणार आहे.
शवविच्छेदन अहवाल आल्यावर पुढील कारवाई होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
सदर प्रकरणाचा तपास चंद्रपूर शहर पोलीस करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने