India crime news
पंजाब - मागील वर्षी पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती, सिद्धू च्या हत्येमध्ये गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई व गोल्डी ब्रार यांचा हात असल्याचे स्पष्ट झाले होते, मात्र आता यांच्या निशाण्यावर बॉलिवूड मधील भाईजान म्हणजेच सलमान खान आहे, त्याला आम्ही लवकर मारू असे विधान गोल्डी ब्रार ने केले आहे.
सलमान खान ने आमच्या समाजाला खूप निराश केले आहे, आमच्या बिष्णोई समाजात झाडे, वनस्पती व प्राण्यांचा मोठा आदर आहे, मात्र सलमानने हरणाचा वध केला होता, राजस्थान राज्यातील बिकानेर मध्ये बिष्णोई समाजाचे मंदिर आहे, सलमान खान ने तिथे येऊन आमची माफी मागावी अन्यथा आम्ही त्याचा आमच्या पद्धतीने हिशोब करू असे लॉरेन्स बिष्णोई ने म्हटले आहे.
सलमान हा माफी मागणार नाही, त्यामुळे आम्ही त्याला मारू, नक्कीच मारू, सलमान खानला मारणे हेच आमच्या आयुष्याचे ध्येय आहे अशी मुलाखत गोल्डी ब्रार ने काही दिवसांपूर्वी दिली होती.
सलमान सध्या लॉरेन्स गँगच्या हिटलिस्टवर असून त्याला अनेक धमकीचे ईमेल सुद्धा आले आहे, ईमेल आल्यानन्तर सलमान खान ने परदेशातून बुलेट प्रूफ वाहन घेतले आहे, त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने गंभीर दखल घेतली आहे.