पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी

पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी

Amravati crime

अमरावती - लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेला ओळखल्या जाते मात्र आज हा स्तंभ धोक्याच्या पातळीवर गेला आहे, विरोधात बातमी लावली की पत्रकाराला धमकी दिल्या जाते, इतकेच नव्हे तर प्राणघातक हल्ला सुद्धा करण्यात येतो.


असाच एक प्रसंग अमरावती जिल्ह्यातील एका पत्रकारासोबत घडला आहे, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत थिलोरी ते गणेशपूर रस्त्यावर पुलाचे बांधकाम सुरू आहे, मात्र कंत्राटदार या कामात बेजबाबदार पणा करीत असून बांधकामात वापरण्यात येणारे साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे वापरीत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

प्रकरण काय आहे?

पुलाच्या बांधकामासाठी शासनाच्या वतीने 80 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, थिलोरी येथील रहिवासी आकाश वाकपानजर यांनी दर्यापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाऊन निकृष्ठ बांधकामाची तक्रार केली, याबाबत त्यांनी निवेदन सुद्धा दिले.
गावकऱ्यांनी तक्रार केल्यावर त्याबाबत पत्रकार किरण होले यांनी बातमी प्रकाशित केली, बातमी प्रकाशित झाल्यावर कंत्राटदाराचा राग अनावर झाला.

माझ्या पुलाच्या बांधकामाबाबत बातमी का लावली म्हणून कंत्राटदाराने होले यांना जीवे मारण्याची धमकी मोबाईल व व्हाट्सएपच्या माध्यमातून दिली.
धमकी मिळताच होले यांनी कंत्राटदार विरोधात दर्यापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करीत गुन्हा नोंद केला.
पुढील तपास दर्यापूर पोलीस करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने