ती शेवटची सेल्फी ठरली

ती शेवटची सेल्फी ठरली

Chandrapur accident news

चंद्रपूर :- चंद्रपूर फूड ऍण्ड ड्रग्स विभागाचे निरीक्षक यांचा कारच्या अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील चिंधीमाल फाट्या जवळ घडली.  



चंद्रमणी डांगे (५१) असे मृतक निरीक्षकाचे नाव आहे, अपघातात डांगे यांचा जागीच मृत्यू तर पत्नी सुमना डांगे (४८) आणि मुलगी दिया डांगे (२१) किरकोळ जखमी झाले आहेत, ताडोबा व्याघ्रप्रकल्पाच्या मोहर्ली वरून दुपारी डांगे हे आपल्या परिवारासह नागपूर ला जात असतांना  चिंधीमाल फाट्या जवळ त्यांचं कार वरून नियंत्रण सुटल्याने कार सरळ रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला, घटनेची माहिती मिळताच नागभीड पोलीस घटनास्थळी पोहचली व जखमींना तात्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कसा झाला अपघात?


चंद्रमणी डांगे हे आपल्या कुटुंबीय तसेच नातलगांसह १७ मे रोजी ताडोबा येथे सफारीसाठी गेले होते. दोन दिवस ताडोबात मुक्कामी होते. सफारी केल्यानंतर ते शुक्रवारी परतीच्या प्रवासासाठी नागभीडमार्गे नागपूरला निघाले होते. डस्टर कारमध्ये (एमएच ४० एसी ३०८३) पत्नी सुमन व मुलगी होती. ते स्वतः कार चालवीत होते, तर दुसऱ्या गाडीत त्यांचा साळा, साळ्याची पत्नी व मुले होती, अशी माहिती मिळाली आहे.
नागभीडमार्गे नागपूरला जात असताना त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर धडकली. धडक इतकी भीषण होती की, चंद्रमणी डांगे व त्यांची पत्नी गंभीररित्या जखमी झाले. 

त्याचवेळी तळोधीकडून नागभीडकडे येत असलेले नागभीड ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सचिन चिलबुले यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून लगेच रुग्णवाहिका बोलावली. चंद्रमणी डांगे आणि त्यांच्या पत्नीला नागभीडच्या ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र, डॉक्टरांनी डांगे यांना मृत घोषित केले. पत्नी सुमन यांना पुढील उपचारासाठी ब्रह्मपुरी येथे हलविण्यात आले आहे. सुदैवाने त्यांच्या कारमध्ये असलेल्या त्यांच्या मुलीला काहीही इजा झाली नाही. विशेष म्हणजे, चंद्रमणी डांगे हे चार दिवसांपूर्वीच कार्यालयीन कामासाठी नागभीडला आले होते, अशी माहिती मिळाली आहे.

 घटनेचा अधिक तपास नागभीड पोलीस करीत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने