पुन्हा निर्घृण हत्याकांड, लिव्ह इन पार्टनरची हत्या

पुन्हा निर्घृण हत्याकांड, लिव्ह इन पार्टनरची हत्या

The brutally crime
हैद्राबाद - दिल्लीत लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या श्रद्धा वॉलकर च्या हत्याकांडांनातर पुन्हा तसेच एक निर्घृण हत्याकांडाची घटना समोर आली आहे, ही घटना दक्षिण भारतातील हैद्राबाद येथे घडली.




एका व्यक्तीने लिव्ह इन पार्टनर ची चाकूने वार करीत तिच्या मृतदेहाचे विल्हेवाट लावण्यासाठी तिचे तुकडे केले, मात्र तो पोलिसांना गवसला.

48 वर्षीय बी.चंद्रमोहन व 55 वर्षीय अनुराधा रेड्डी हे लिव्ह इन मध्ये सोबत राहत होते, चंद्रमोहन ने वर्ष 2018 मध्ये अनुराधा कडून 7 लाख रुपये घेतले होते, ते पैसे परत मिळावे यासाठी अनुराधा ने तगादा लावला, मात्र चंद्रमोहन पैसे परत देत नसल्याने 12 मे ला दोघांमध्ये वाद झाला.
आरोपी चंद्रमोहन ने अनुराधा च्या पोटावर अनेक चाकूने वार केले, यामध्ये अनुराधा चा मृत्यू झाला.
याबाबत कुणाला काही कळू नये यासाठी चंद्र मोहन ने अनुराधा चे नातेवाईक व ओळखीच्याया लोकांना ती दुसरीकडे राहते असे मॅसेज तिच्या मोबाईलने केले.

वरच्या खोलीत अनुराधा चा मृतदेह ठेवण्यात आला, आरोपीने दुर्गंधी येऊ नये यासाठी परफ्युम व फवारणी करीत होता, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपी चंद्र मोहन ने 2 स्टोन मशीन घेतल्या, त्या मशीनच्या साह्याने अनुराधा च्या मृतदेहाचे तुकडे केले, अनुराधा चे शीर व शरीराचे इतर भाग त्याने शहरातील डम्पिंग यार्ड येथे फेकले शरीराचे काही भाग त्याने फ्रीज मध्ये ठेवले होते.

पोलिसांना महिलेचे शीर मिळताच त्यांनी तपासाला सुरुवात केली, पोलिसांनी प्रकरणाचा तपास जलद व्हावा यासाठी 8 पथके तयार केली, पोलोसांच्या तपासादरम्यान आरोपी चंद्र मोहन त्यांना भेटला, त्याने पोलिसांसमोर हत्येची कबुली दिली.
पैश्यासाठी वारंवार तगादा लावल्याने चंद्रमोहन ने अनुराधा ची हत्या केली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने