चंद्रपूर जिल्ह्यातील 4 "नटवरलाल" पोलिसांच्या ताब्यात

चंद्रपूर जिल्ह्यातील 4 "नटवरलाल" पोलिसांच्या ताब्यात

Chandrapur investment scam
चिमूर / चंद्रपूर - वर्ष 2012 ते 2021 पर्यंत चिमूर शहरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पतसंस्थेत तब्बल साडे 7 कोटी रुपयांची अफरातफर केल्याची बाब लेखा परीक्षण अहवालात उघडकीस आली होती. Investment scam



बनावट दस्तावेज व फेरफार केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने 4 जणांना अटक केली असून यामध्ये पतसंस्थेचे माजी उपाध्यक्ष, माजी व्यवस्थापक सहित चौघांना अटक केली आहे.

माजी उपाध्यक्ष अरुण संभाजी मेहुरकुरे, माजी व्यवस्थापक मारोती पेंदोर, माजी मुख्य लिपिक अमोल मेहुरकुरे व अतुल मेहुरकुरे यांना 19 मे ला अटक करण्यात आली. 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागरी पतसंस्थेत गोर गरीब नागरिकांनी आरडी, FD व दैनंदिन बचत करीत लाखो रुपये जमा केले होते, मात्र एजंट ते माजी उपाध्यक्ष यांना पैश्याची चमक नजरेत भरल्याने त्यांनी विविध खातेदाराच्या नावाने बनावट कर्ज, नातेवाईकांच्या खात्यावर पैसे जमा करणे असे अनेक बोगस प्रकार आरोपीनी केले.
लेखा परीक्षण अहवालात साडे 7 कोटी रुपयांची अफरातफर लक्षात येताच उपलेखपाल यांनी चिमूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, याप्रकरणी 9 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
गुन्हा दाखल झाल्यांनातरही कुणालाही अटक करण्यात आली नसल्याने पतसंस्थेतील गुंतवणूक दारांनी अन्याय निवारण समिती स्थापन करीत साखळी उपोषण सुरू केले होते.
तब्बल 24 दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आर्थिक गुन्हे शाखेने 4 जणांना या प्रकरणी अटक केली.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने