प्रेयसीने केली प्रियकराची हत्या

प्रेयसीने केली प्रियकराची हत्या

Pune crime news
पुणे -शिक्षणाचं माहेरघर म्हणून पुण्याची राज्यात ओळख आहे, या माहेरघरात अहमदनगर जिल्ह्यातून शिक्षणासाठी आलेली तरुणीने प्रियकराची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
सदर तरुणी ही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी प्रियकराच्या खोलीवर गेली होती मात्र त्याठिकाणी दोघांमध्ये किरकोळ वाद झाला, वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.



प्रेयसिने भाजी कापण्याच्या चाकूने प्रियकरावर हल्ला केला, या हल्ल्यात प्रियकराचा मृत्यू झाला तर झालेल्या झटापटीत प्रेयसी जखमी झाली.

21 वर्षीय आकांक्षा पन्हाळे असे जखमी झालेल्या प्रेयसीचे नाव आहे तर या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रियकर 22 वर्षीय यशवंत मुंडे रा. लातूर असे त्याचे नाव आहे.

दोघेही वाघोली येथील रायसोनी कॉलेज मधील डेटा सायन्स या अभ्यासक्रमात द्वितीय वर्षात शिक्षण घेत होते, परीक्षा असल्याने अभ्यास करण्यासाठी आकांक्षा ही यशवंत च्या खोलीवर गेली होती, मात्र त्यावेळी दोघांचा वाद झाला, वाद वाढला असता आकांक्षा ने भाजी चिरण्याच्या चाकूने यशवंत वर हल्ला केला, या झटापटीत आकांक्षा सुद्धा जखमी झाली.
लोणीकंद पोलिसांनी आकांक्षा वर खुनाचा गुन्हा दाखल केला असून वादाचे कारण काय याचा तपास सुरू केला आहे.
सध्या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने