चंद्रपुरात घडली अशी घटना की पोलिसांना करावं लागलं हे काम

चंद्रपुरात घडली अशी घटना की पोलिसांना करावं लागलं हे काम

Chandrapur Gang of women looting money and gold

चंद्रपूर - लग्न समारंभ, रेल्वे स्टेशन व बस स्थानक परिसरातील गर्दीच्या ठिकाणी जाताना आता नागरिकांनी महत्वपूर्ण काळजी घ्यावी कारण एका घटनेमुळे पोलिसांना आवाहन करावे लागले आहे.



चामोर्शी जिल्हा गडचिरोली येथील 49 वर्षीय सविता वाळके ह्या लग्न समारंभाकरिता चंद्रपूरला बसने येण्यासाठी निघाल्या, सकाळी 11 वाजता बस चंद्रपुरात पोहचली मात्र बस मधून खाली उतरताना वाळके यांच्या पायात असलेली चप्पल तुटली.
लग्न समारंभात आता जायचं कस? असा प्रश्न त्यांच्यापुढं उभा राहिला त्यांनी तात्काळ जटपूरा गेट गाठत तिथून नवी चप्पल घेत, तुकुम कडे जाण्यासाठी ऑटो ची वाट बघू लागल्या, ऑटो आल्यावर त्यामध्ये बसताना अचानक 2 महिला ऑटो मध्ये येऊन बसल्या, आधीच जागा नसलेल्या ऑटोत त्या गर्दी करून बसल्या व बस स्थानक परिसरात उतरल्या, त्या गेल्या नंतर वाळके यांनी बघितले की त्यांच्या हॅन्ड बॅग ची चैन उघडलेल्या अवस्थेत दिसली. Ramnagar police station chandrapur

बॅग मधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 1 लाख 11 हजार रुपयांचा माल त्या महिलांनी लंपास केल्याचा संशय वाळके यांना बळावला, त्यांनी याबाबत रामनगर पोलीस स्टेशन गाठत त्या अनोळखी महिलांविरुद्ध तक्रार दाखल केली.

रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करताच गुन्हे शोध पथक आरोपीच्या शोधात निघाले, बल्लारपूर-बायपास रोडवर संशयास्पद महिला ऑटो मध्ये जाताना पोलिसांना दिसल्या, त्यांनी तो ऑटो थांबवित फिर्यादी महिलेला त्याठिकाणी पाचारण केले, फिर्यादी महिलेने त्या दोन्ही अनोळखी महिला ओळखले.
त्या महिलांना ताब्यात घेत चोरी गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला.

रामनगर पोलीस स्टेशनमधील गुन्हे शोध पथकाचे चमूने तात्काळ गुन्ह्यातील आरोपीना अटक केली.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश मुळे, सपोनि हर्षल एकरे, पोउपनी मधुकर सामलवार, पोलीस कर्मचारी प्रशांत शेंदरे, मिलिंद दोडके, चिकाटे, निलेश मुळे, सतीश अवथरे, लालू यादव, विकास जुमनाके, वैशाली अलोने यांनी केली.

रामनगर पोलिसांचे महत्वाचे आवाहन

सध्या मुलांच्या शाळेला सुट्ट्या लागलेल्या असून लग्न समारंभाचे दिवस सुरू आहे, गर्दीच्या ठिकाणी जाताना आपली बॅग सुरक्षित रहावी यासाठी प्रयत्न करावे कारण गर्दीच्या ठिकाणी बस स्थानक, रेल्वे स्टेशन जवळ पैसे व दागिने लुटणारी महिलांची टोळी सक्रिय झाली आहे, ऑटो मध्ये किंवा बस मध्ये प्रवास करताना रोख व दागिने सांभाळून ठेवावे, कारण चंद्रपूर शहरात या प्रकारच्या टोळ्या आजही सक्रिय आहे, असे काही आढळल्यास रामनगर पोलिसांना कळविण्यात यावे असे आवाहन पोलीस प्रशासन मार्फत करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने