पाली कुटुंबात दुहेरी हत्याकांडाचा प्रयत्न

पाली कुटुंबात दुहेरी हत्याकांडाचा प्रयत्न

Crime story's
यवतमाळ - बोअर खोदण्याच्या वादातून पांढरकवडा मार्ग, यवतमाळ येथे राहणाऱ्या पाली कुटुंबात रक्तरंजित झटापट झाली. Yavatmal crime

नरेंद्र पाली यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने मंगळवारी त्यांनी आपल्या आवारात बोअर खोदण्याचे काम सुरू केले, बोअर खोदण्याचा व जागेचा वाद सुरू झाल्याने नरेंद्र पाली व त्यांचा पुतण्या सूरज पाली यांच्यामध्ये वाद सुरू झाला, वाद वाढत असताना नरेंद्र पाली यांचा राहुल नामक मुलाने वादात उडी घेतली.
त्यांनतर सूरज पाली ने लोखंडी सळाखीने दोघांवर हल्ला केला, या हल्ल्यात राहुल पाली यांचा जागीच मृत्यू झाला तर नरेंद्र पाली हे गंभीररीत्या जखमी झाले.
जखमी नरेंद्र ला शेजाऱ्यांनी रुग्णालयात नेले, डॉक्टरांनी राहुल ला मृत घोषित केले, हल्ला झाल्यानन्तर आरोपी सूरज पाली ने घटनास्थळा वरून पळ काढला. Maharashtra crime news
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले, स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक प्रदीप परदेशी, शहर ठाणेदार नंदकिशोर पंत यांनी पुढील तपास सुरू करीत आरोपीच्या शोधात पथके तयार केली असल्याची माहिती आहे. 
बोअर खोदण्याच्या क्षुल्लक कारणावरून पाली कुटुंबात रक्तरंजित वाद झाला या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने