डॉक्टरने केले महिला डॉक्टरचे फोटो मार्फ

डॉक्टरने केले महिला डॉक्टरचे फोटो मार्फ

Crime story's
मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये कंत्राटी डॉक्टरांमध्ये पैश्याची देवाण घेवाणी वरून वाद झाला त्यामध्ये महिला डॉक्टरने पैश्याचा तगादा लावल्याने आरोपी डॉक्टरने फिर्यादीचे फोटो मार्फ करीत अश्लील बनवीत ते व्हायरल करीत बदनामी केली, याबाबत दिंडोशी पोलीस ठाण्यात आरोपी डॉक्टरवर 354 (A) (3), 500, 504, 506, 509 अंतर्गत गुन्हा दाखल करीत अटक केली.


Mumbai crime
दोघे डॉक्टर हे महानगरपालिका येथे कंत्राटी म्हणून कार्यरत होते, दोघांची मैत्री झाली, जवळचे संबंध निर्माण झाल्याने त्यातून आरोपी डॉक्टरने फिर्यादीला पैसे मागितले. Photo Morph
ते पैसे परत देण्यासाठी महिला डॉक्टर ने आरोपी कडे तगादा लावला, यावरून दोघांमध्ये अनेकदा भांडणे सुद्धा झाली. Viral photo
आरोपी डॉक्टर पैसे देण्यास टाळाटाळ करीत होता, त्यातून आरोपी डॉक्टरने महिलेचे फोटो मार्फ करीत त्याला अश्लील बनवून व्हायरल केले, यामुळे महिला डॉक्टरची बदनामी झाली.
यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले असता आरोपीने फिर्यादीला अश्लील शब्दात शिवीगाळ केली.
घडलेल्या प्रकाराला कंटाळून महिला डॉक्टरने दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, पोलिसांनी तात्काळ आरोपीवर गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने