Crime story's
चंद्रपूर - 10 डिसेंम्बर 2022 ला शहरातील अरविंद नगर चंद्रपूर येथे राहणारे 48 वर्षीय सुधीर टोंगे हे वास्तू पूजनाच्या कामाकरिता वरोरा येथे गेले होते. Maharashtra crime news
Chandrapur crime
Chandrapur crime
2 दिवस टोंगे यांनी वरोरा येथे मुक्काम केला, त्या दरम्यान घराशेजारी राहणारे पुट्टेवार यांनी टोंगे यांना सम्पर्क साधत घराचा दरवाज्यावरील लागलेले लॉक तुटलेल्या स्थितीत असल्याचे सांगितले.
टोंगे तात्काळ चंद्रपूर ला आले असता ते घरी आले तिथे अलमारीचा दरवाजा उघडा दिसला, त्यामधील सामान अस्तव्यस्त स्थितीत होते, आलमारीत ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 1 लाख 19 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता.
त्याबाबत टोंगे यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. Burglary in chandrapur
गुन्ह्याची चौकशी व तपास करणेकरिता रामनगर गुन्हे शोध पथकातील सपोनि हर्षल एकरे व विनोद भुरले यांनी घटनास्थळ गाठले.
गुन्ह्या स्थळावरील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले व गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी 20 वर्षीय प्रवीण उर्फ चिचू रमेश हांडी रा. इंदिरानगर याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने सदर गुन्हा आपल्या साथीदारांसह केला असल्याची कबुली दिली.
रामनगर पोलिसांनी कसून चौकशी करीत इतर गुन्ह्यात आरोपीचा सहभाग आहे का याबाबत विचारणा केली असता आरोपी हांडी व 19 वर्षीय अमन बाबूल झाडे रा. कृष्णानगर, 30 वर्षीय यमला तंगला कोरवन रा. भद्रावती यांनी पोलीस स्टेशन रामनगर येथे 2 घरफोडया, बंगाली कॅम्प चौक, पोलीस स्टेशन घुघुस व भद्रावती पोलीस स्टेशन हद्दीत वेगवेगळ्या बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न असे गुन्हे केल्याची कबुली आरोपीनी दिली.
त्यासोबत नरेंद्रनगर, जैन ले-आऊट येथे राहणारे 27 वर्षीय काजल कुलमेथे यांच्या घरून 63 हजार रुपयांचा मुद्देमाल (सोने-चांदी व रोख) चोरीला गेला होता.
राधिका सभागृह सरकार नगर येथे राहणारे 59 वर्षीय अफजल हुसेन शेख यांच्या घरून ऑक्टोबर महिन्यात सोन्या-चांदीचे दागिने व रोख असा एकूण 70 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता.
आंबेडकर सभागृह चंद्रपूर येथे राहणारे 42 वर्षीय भास्कर वासुदेव रामटेके यांच्या घरून बजाज पल्सर दुचाकी क्रमांक MH34AQ9258 ही चोरीला गेली होती.
या सर्व गुन्ह्याचा रामनगर पोलिसांनी तपास करीत तब्बल 2 लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत 3 आरोपी व 1 इतर घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी अटक केली.
रामनगर पोलिसांनी आरोपिकडून चोरी गेलेला मुद्देमाल जप्त केला, सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार, पोलीस निरीक्षक राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक प्रमुख सपोनि हर्षल एकरे, पोउपनी विनोद भुरले यांच्या नेतृत्वाखाली पोउपनी मधुकर सामलवार, रजनीकांत पुठ्ठावार, प्रशांत शेंदरे, विनोद यादव, किशोर वैरागडे, चिकाटे, मिलिंद दोडके, निलेश मुडे, सतीश अवथरे, लालू यादव, विकास जुमनाके, हिरालाल गुप्ता, संदीप कामडी, विकास जाधव व भावना रामटेके यांनी केली.