मुल - चंद्रपूर जिल्ह्यात छुप्या पद्धतीने अवैध धंद्याचा बाजार सुरू आहे मात्र पोलिसांची सतर्कता सदर गुन्हेगारी उधळून लावत आहे. Chandrapur crime
Maharashtra crime news
जिल्ह्यातील मूल तालुक्यात मौजा मंदा तुकुम गावाशेजारी तलावाजवळील जंगलात काही जण अवैध रित्या कोंबड्यांची झुंज लढवून पैश्याची बाजी लावत असल्याची गोपनीय माहिती मुल पोलिसांना मिळाली होती.
माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याठिकाणी धाड मारली असता त्याठिकाणी १) राहुल गजानन धोंगडे, वय ४७ वर्ष रा. पळसगांव ता. बल्लारपूर, जि. चंद्रपूर, २) सचिन सुधाकर वासाडे, वय ३५ वर्ष रा. आमडी ता. बल्लारपूर जि. चंद्रपूर, ३) अरविंद सुंदरशाहा सिडाम, वय ३७ वर्ष रा. कवडजई ता. बल्लारपूर जि. चंद्रपूर, ४) चैतन्य विलास डाहूले, वय २२ वर्ष रा. इंदीरानगर, चंद्रपूर ता. जि. चंद्रपूर, ५) रमेश साधुजी बलकी, वय ३३ वर्ष रा. इंदीरानगर, चंद्रपूर ता. जि. चंद्रपूर, ६) मनोज बंडु महाकुलकर, वय ३२ वर्ष रा. इंदीरानगर, चंद्रपूर ता. जि. चंद्रपूर, ७) बिंदुशिल वनवास राऊत, वय ३२ वर्ष रा. इंदीरानगर, चंद्रपूर ता. जि. चंद्रपूर, ८) घनशाम गोपाळराव मोरे, वय ३९ वर्ष रा. इंदीरानगर, चंद्रपूर ता. जि. चंद्रपूर, ९) विलास भगवान शेडमाके, वय ४० वर्ष रा. वार्ड क्र १३, सावली, ता सावली जि. चंद्रपूर, १०) ओमप्रकाश मधुकर मोहूर्ले, वय ४० वर्ष रा. वार्ड क्र १३, सावली, ता सावली जि. चंद्रपूर, ११) नागेश गोविंदा मांदाळे, वय ४० वर्ष रा. वार्ड क्र १२, सावली, ता सावली जि. चंद्रपूर, १२) आनंद लक्ष्मण चलकलवार, वय ६५ वर्ष रा. वार्ड क्र १४, सावली, ता सावली जि. चंद्रपूर, १३) उत्तम पुरुषोत्तम मोहूर्ले, वय ४० वर्ष रा. वार्ड क्र १२, सावली, ता सावली जि. चंद्रपूर असे कोंबडा जुगार खेळताना मिळून आले असून त्यांच्या ताब्यातून ४ जखमी कोंबडे, नगदी २४३०/- रू, ७ अॅन्ड्रॉईड मोबाईल व ६ मोटार सायकल असा एकूण ३,३८,४३० /- रू चा माल जप्त करून आरोपी विरूदध गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची यशस्वी कारवाई पो स्टे मुल येथे पोउपनि पुरुषोत्तम राठोड, नापोअं चिमाजी देवकत्ते, गजानन, पोअं संजय, पोअं अंकुश, चालक पोअं स्वप्नील यांनी उपविपोअ मल्लीकार्जुन इंगळे सा. व पो नि श्री सतीशसिंह राजपूत सा. यांच्या मार्गदर्शनात केली आहे.