चंद्रपूर - देखावा करीत अनेकजण आजही फसवणुकीचे काम सर्रासपणे करीत आहे, जो दीखता है वही बिकता है या वाक्यावर चालणारे आजही अनेकजण आपल्या आजूबाजूला वावरत आहे. Fraud
असाच एक 38 वर्षीय भरत धोटे ने शेकडो नागरिकांना कोट्यवधींचा गंडा घालत पसार झाला. A multi-crore scam in chandrapur
आमच्याकडे सुलभ हफत्यात चांगला प्लॉट मिळेल, प्लॉट घ्या आम्ही तुमचा प्लॉट भाड्याने घेत दरमहा पैसे देऊ असे भासवीत अनेकांची फसवणूक केल्याची बाब चंद्रपुरात उघडकीस आली आहे. Chandrapur crime
भरत धोटे यांनी चंद्रपुरात काही जमिनी भाड्याने घेत त्यावर प्लॉट पाडले, नंतर भार्गवी लँड डेव्हलपर्स नामक कम्पनी स्थापित केली, एजंट नेमले व सुरू झाला फसवणुकीचा गोरखधंदा.
जाहिरात प्रसिद्ध करीत पद्मापुर येथे 1 हजार चौरस फूट जागा 2 लाख 50 हजार रुपये किंमत ठरवीत नागरिकांना भुरळ पाडली. Tadoba tourism
ती जागा 30 महिण्याकरिता युनिव्हर्स ऍग्रो टुरिझम प्रायव्हेट लिमिटेड च्या नावाने करारनामा करीत त्या जागी कुट्याचे बांधकाम करीत ताडोबा येथे येणाऱ्या पर्यटकांना किरायाने देत तिथून मिळणाऱ्या उत्पन्ना मधून प्लॉट धारकांच्या खात्यात 30 महिने 7 हजार 83 रुपये बँक खात्यात जमा करण्याचे आमिष दिले.
त्या आमिषाला अनेक नागरिक बळी पडले, पैश्याच्या लालसेपोटी अडीच लाख रुपये रोख, चेक, RTGS , गुगल पे व phone pay च्या माध्यमातून धोटे यांना नागरिकांनी दिले.
2 महिने धोटे यांनी प्लॉट धारकाच्या खात्यात पैसे सुद्धा जमा केले मात्र त्यानंतर पैसे खात्यात येणं बंद झाले. Maharashtra crime news
प्लॉट धारकांनी जमिनीची रजिस्ट्री करून महिनेवारी पैसे द्यावे असा तगादा लावला मात्र धोटे यांनी फक्त पुढच्या तारखा दिल्या, त्यांनंतरही कुणाचे पैसे व जमिनीची रजिस्ट्री करून मिळाली नाही.
मात्र प्रत्यक्षात जेव्हा प्लॉट धारकांनी सदर जमिनीची पडताळणी केली असता ती जमीन दुसऱ्याच्या नावावर असल्याची माहिती मिळाली.
त्या जागेवर धोटे यांनी ले-आऊट कसे उभारले? त्यांना जमीन मालकांनी अडवणूक का केली नाही हा मोठा प्रश्न असून जमीन मालकांचा सुद्धा या फसवणुकीत सहभाग असू शकतो असा संशय आयोजित पत्रकार परिषदेत प्लॉट धारकांनी व्यक्त केला आहे.
भरत धोटे यांनी वारंवार प्लॉट धारकांना पैसे देतो म्हणून वेळ मारली त्यानंतर त्यांना धनादेश देण्यात आले मात्र तेही बाऊन्स झाले.
इसारपत्र ची मुद्दत संपली मात्र जमिनीची रजिस्ट्री न झाल्याने आपली फसवणूक झाली असा पूर्ण विश्वास बसल्यावर प्लॉट धारकांनी धोटे विरोधात दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली.
पोलिसांनी धोटे वर कलम 420, 406, 467 व 468 अंतर्गत गुन्हा दाखल केला.
सध्या भरत धोटे हा पोलिसांच्या अटकेपासून पसार झाला आहे. Land Registry
प्लॉट धारकांनी पत्रकार परिषदेत न्याय मागितला असून आम्ही आमच्या कष्टाचे पैसे त्या जमिनीत गुंतविले पण आमची फसवणूक झाली, आता सदर बाब दुसऱ्या कुणासोबत घडू नये यासाठी ही पत्रकार परिषद घेतल्याचे अशोक भटवलकर व इतर प्लॉट धारकांनी सांगितले.