चंद्रपूर - मार्केटिंगच्या कामासाठी आलेल्या इसमाचा शहरातील वरोरा नाका उड्डाणपुलावर मोबाईलवर बोलत असताना अज्ञात 2 युवकांनी मोबाईल हिसकाविला, मात्र या घटनेत फिर्यादी यांनी त्या युवकांच्या दुचाकी वाहनाचा नंबर घेत रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. Chandrapur crime
27 वर्षीय सुधीर गजबे रा. समुद्रपूर वर्धा हे 12 जानेवारीला चंद्रपुरात मार्केटिंग च्या कामासाठी आले होते. Mobile snatching
चिमूर वरून चंद्रपूरला खाजगी ट्रॅव्हल्स ने आल्यावर गजबे हे चंद्रपुरातील वरोरा नाका चौकात उतरले, तिथं पोहचल्यावर त्यांना तुकुम मार्गावर जायचे असल्याने त्यांनी पायदळ प्रवास सुरु केला, त्यावेळी ते वरोरा नाका उड्डाणपुलावरून जात होते.
रात्रीचे 9 वाजले ते आपल्या रेडमी कंपनीच्या मोबाईलवर बोलत असताना अचानक 2 युवक दुचाकीवरून आले, त्यांनी गजबे यांच्या हातात असलेला मोबाईल हिसकावीत तिथून पळ काढला.
मात्र गजबे यांनी त्या दुचाकी वाहनाचा क्रमांक नोट करीत दुसऱ्या दिवशी रामनगर पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. Crime news
वाटमारी ची तक्रार दाखल होताच गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या 6 तासात सदर गुन्ह्याचा छडा लावत 2 आरोपींना अटक केली.
यामध्ये आरोपी 20 वर्षीय चेतन विनोद मांढरे रा.घुटकाला, 21 वर्षीय आकाश गणेश दिकोंडवार रा.घुटकाला चंद्रपूर यांना अटक केली.
पोलिसांनी आरोपिकडून चोरी गेलेला मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी क्रमांक MH34 BM0237 व 2 मोबाईल असा एकूण 96 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार, पोलीस निरीक्षक राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या नेतृत्वाखाली पोउपनी विनोद भुरले, तसेच गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी केली.