चंद्रपूर शहरात स्थानिक गुन्हे शाखेने पकडला नायलॉन मांजा

चंद्रपूर शहरात स्थानिक गुन्हे शाखेने पकडला नायलॉन मांजा

Crime story's
चंद्रपूर - जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रेत्यांवर सरळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलीस विभागाला दिल्यानंतर पोलीस कर्मचारी सक्रिय झाले. Local crime branch chandrapur
मंगळवार 10 जानेवारीला स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर ने सेंट मायकल शाळे समोरील अष्टविनायक पतंग सेंटर मध्ये धाड मारीत चायनीज नायलॉन मांजा जप्त केला.
चायनीज नायलॉन मांजामुळे मानवी व पशु जीवितास हानी होत आहे, सदर मांज्याने आजपर्यंत अनेक नागरिकांचे गळे चिरले आहे, अनेकांचा यामध्ये जीव गेला असताना सुद्धा चंद्रपुरात अवैधपणे मांजाची विक्री सुरू आहे.
यंदा चंद्रपूर पोलीस विविध भागात असणारे पतंग सेंटर ची माहिती घेत प्रतिबंधित मांजा तर विकत नाही न याची चौकशी करीत आहे. Maharashtra crime news
अष्टविनायक पतंग सेंटरमध्ये मारलेल्या धाडीत दीड पेटी नायलॉन मांजा एकूण किंमत 60 हजार रुपये जप्त करण्यात आले.
सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि भोयर, स्वामी चालेकर, नितीन साळवे, प्रकाश बलकी, मिलिंद जांभुळे, अजय बागेसर व प्रमोद डंभारे यांनी केली. Nylon manja
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने