चंद्रपूर /घुग्गुस - स्थानिक गुन्हे शाखेने घुग्गुस येथे चरस पकडल्यावर आता घुग्गुस पोलीसानी 1 किलो 700 ग्राम गांजा पकडला आहे. Chandrapur crime news
Crime news
घुग्गुस परिसरात काही दिवसांपासून पुड्या च्या माध्यमातून युवकांमध्ये गांजा ची विक्री सुरू होती, याबाबत पोलीस स्टेशनच्या सहायक पोलिस निरीक्षक मेघा गोखरे यांना गोपनीय माहिती मिळाली.
माहितीच्या आधारावर मेघा गोखरे यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाने 12 जानेवारीला केमिकल वार्ड क्रमांक 6 येथील एक घरी धाड मारली. आरोपी त्या घरातून गांजा विक्री करीत होते.
मारलेल्या धाडीत पोलिसांना तब्बल 1 किलो 700 ग्राम गांजा मिळाला.
या प्रकरणी पोलिसांनी 23 वर्षीय भीम धुपदेव तिवारी व 23 वर्षीय प्रताप रमेश सिंह या आरोपींना अटक केली. Maharashtra crime news
अटक झालेल्या आरोपीवर पोलिसांनी NDPS अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला, दोन्ही आरोपींना न्यायालयापुढे हजर करीत 2 दिवसांचा पीसीआर न्यायालयाने मंजूर केला.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार, पोलीस निरीक्षक बबन पुसाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मेघा गोखरे यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे पोउपनी गौरीशंकर आमटे, अवधेश ठाकूर, महेंद्र भुजाडे, मनोज धकाते, रणजित भुरसे, सचिन वासाडे, नितीन मराठे, विजय ढपकस, समीक्षा भोंगळे, प्रकाश करमे व महेंद्र वन्नकवार यांनी केली.