प्रेयसीसोबत का बोलतो म्हणून युवकावर प्राणघातक हल्ला

प्रेयसीसोबत का बोलतो म्हणून युवकावर प्राणघातक हल्ला

Crime story's (प्रशांत गेडाम)
चंद्रपूर/नागभीड - चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात प्रेम त्रिकोणातून प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे.
Love tringal 

सदर प्रकरणी 10 जानेवारीला मौजा मींडाळा येथे नाटक बघण्यासाठी 20 वर्षीय रुपेश सिडाम हे गेले असता मयूर दाणी यांनी रुपेश ला फोन करीत अश्लील शब्दात शिवीगाळ करीत कोदेपार मार्गावर भेटण्यासाठी बोलाविले.
मयूर ने रुपेश ला माझ्या प्रेयसीला तू कॉल कशाला करतोस म्हणून जाब विचारला, तिच्यासोबत तू बोलत नको जाऊ म्हणत दोघांचा वाद झाला, वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असता मयूर ने स्वताजवळील धारदार चाकूने रुपेश च्या छातीवर व पोटावर वार केले.
आरोपी मयूर ने रुपेश ला जीवे मारण्याच्या हेतूने हल्ला करीत गंभीररीत्या जखमी केले, याबाबत पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळ गाठले.
जखमी रुपेश ला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्याचे बयान वरून मयूर दाणी वर कलम 307 व एट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली. Chandrapur crime
पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने