चंद्रपूर/घुघुस - चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अंमली पदार्थांच्या तस्करी प्रमाणात मोठी वाढ झाली असून चंद्रपूर पोलीस अंमली पदार्थाच्या तस्करीवर नियंत्रण यावे यासाठी प्रयत्नशील आहे. Narcotics
चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना चंद्रपूर तालुक्यातील घुघुस येथे 32 वर्षीय वतन लक्ष्मण ताटेपल्ली रा. घुघुस हा अंमली पदार्थ सोबत घेऊन विक्रीसाठी आणला असल्याची गोपनीय माहिती मिळाली. Lcb chandrapur
माहितीच्या आधारे खाडे यांनी सपोनि मंगेश भोयर यांना कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले, त्यांनतर स्थानिक गुन्हे शाखेची चमू घुघुस येथे पोहचली. Maharashtra crime news
पोलिसांनी वतन ला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याच्याजवळून 174 ग्राम चरस जप्त करण्यात आले, आरोपीवर घुघुस पोलीस स्टेशनमध्ये NDPS ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक मंगेश भोयर, संजय आतकुलवार, प्रमोद डंबारे, संतोष एलपूलवार, नितीन रायपूरे, रवींद्र पंधरे, गोपाळ आतकुलवार, कुंदनसिंग बावरी, नरेश डाहूले, निराशा तितरे यांनी यशस्वीपणे पार पाडली. Crime news
प्रकरणाचा पुढील तपास घुघुस पोलीस करीत आहे.