वरोरा येथील रेतीघाटावर असलेले सरकार राज पोलिसांनी उधळले

वरोरा येथील रेतीघाटावर असलेले सरकार राज पोलिसांनी उधळले

Crime story's
वरोरा - वर्ष 2022 च्या सरत्या दिवशी वरोरा पोलिसांनी रेती घाटावर अवैध उत्खनन करणाऱ्या राजकीय वरदहस्त असणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल करीत मोठी कारवाई केली. Chandrapur crime
वरोरा तालुक्यातील वर्धा नदीच्या पात्रजवळील करंजी रेती घाटावर अवैध रेती उत्खनन होत असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. Warora police
पोलिसांनी दुपारच्या सुमारास रेती घाटावर धाड टाकली असता तिथे काहींनी पळ काढला सुरुवात केली, घाटावर पोलिसांना 2 पोकलँड व 6 हायवा ट्रक व 8 वाहनचालक व रेती घाट मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी यावेळी रेती घाटावर पंचनामा केला असता त्याठिकाणी नदीचा प्रवाह बदलण्यात आला होता, याबाबत वाहनचालकांची विचारपूस केली असता आमच्याकडे रेती उत्खननाचा कसलाही परवाना नाही असे सांगितले व सदर काम रेती घाट मालकांनी करायला लावले अशी कबुली दिली.
वरोरा पोलिसांनी वाहन क्रमांक MH34AB9872, MH34AB4356, MH40BG2475, MH34AV2353, MH40AK1212, MH27BX1199, 2 पोकलँड वाहन असा एकूण 2 कोटी 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत वाहनचालक सूरज टोंगे, रोशन दाते, राजेश उके, संदीप कुबळे, प्रशांत कोल्हे, आशिष लांबट, रवी वाघमारे, विवेक राऊत, रेती घाट मालक प्रवीण घागी व काशिफ खान यांच्यावर कलम 379, 511, 430, 431, 109, 188, 34, 48(7) व 48 (8) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. Maharashtra crime news
सदरची कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी आयुष नोपाणी यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे व पोलीस कर्मचारी यांनी यशस्वीपणे पार पाडली.
मागील अनेक महिन्यापासून वरोरा येथे रेतीचे उत्खनन नदीचा प्रवाह थांबून होत आहे, त्याठिकाणी बंधारा बांधत पिण्याचे पाणी दूषित करण्याचे काम रेती तस्कर करीत आज रेती घाटावरून नियमबाह्य पद्धतीने अवैध उत्खनन सुरू आहे.
या अवैध धंद्यात राजकीय वरदहस्त असलेला सरकार च्या नावाने प्रसिद्ध आरोपी गुंतला आहे.
Sand smuggelling

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने