मूळव्याध चा उपचार करणारा डॉक्टर झाला पसार

मूळव्याध चा उपचार करणारा डॉक्टर झाला पसार

Crime story's
अमरावती - कोरोना नंतर अनेक नागरिकांना मुळव्याध, फिशर चा त्रास सुरू झाला होता, आज या व्याधीवर उपचार करणारे अनेक चांगले डॉक्टर्स आहे मात्र गावातील नागरिक काही बोगस डॉक्टरांच्या उपचाराला बळी पडत स्वतःच आरोग्य धोक्यात टाकत आहे.

bogus doctor
असाच एक बोगस डॉक्टर अमरावती जिल्ह्यातील शिराळा गावात स्वतःचे रुग्णालय स्थापित करीत तिथे मूळव्याध, फिशर व भगंदर सारख्या व्याधीवर उपचार करीत होता.
मात्र त्या डॉक्टरकडे असणारी BAMS ची पदवी बोगस असल्याचा सुगावा पंचायत समिती मधील विस्तार अधिकाऱ्याला लागला, त्यानंतर बोगस समिती पथकाकडे तक्रार दाखल करण्यात आली. Piles
पथक शिराळा गावात पोहचले असता त्यांनी डॉ. बाला यांना नोंदणी प्रमाणपत्र मागितले असता त्यांनी डॉक्टर मोहिब अरहिल नसिब अहमद खान यांच्या नावाचे MBBS प्रमाणपत्र पथकाला दिले. सदर प्रमाणपत्र हे अन्य दुसऱ्या डॉक्टरच्या नावे असल्याचे निदर्शनास आले असता पथकाने रुग्णालय सील केले, पथकाने संपूर्ण चौकशी करीत विस्तार अधिकारी राम पिंजरकर यांच्या तक्रारीवरून वलगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
गुन्हा दाखल झाला असल्याची बाब कळताच डॉक्टर बाला यांनी गावातून पळ काढला, डॉ. बाला यांना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक त्यांच्या मागावर आहे. Amravati crime
डॉ. बाला यांच्या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा पथकाने जप्त केला आहे. Maharashtra crime news
बोगस डॉक्टर सध्या रुग्णांच्या जीवाशी खेळ करण्याचे काम करीत आहे त्यांच्यावर आरोग्य विभागाने कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. hemorrhoids

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने