हजारोंचा पगार मागणी अडीच हजार

हजारोंचा पगार मागणी अडीच हजार

Crime story's
चंद्रपूर/वरोरा - आरोग्य सेवक पदावरून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याची अर्जित रजेचे सममूल्य रकमेचे 6 लाख 56 हजार 600 रुपयांचे बिल काढून देण्यासाठी वरोरा पंचायत समितीमधील सहायक लेखा अधिकारी आनंद कांबळे यांनी 4 हजार रुपयांची मागणी केली. Assistant Accounts Officer

तडजोडीअंती अडीच हजार रुपये देण्याचे ठरले, लाचेची रक्कम घेतेवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहायक लेखा अधिकाऱ्याला रंगेहात अटक केली. Bribe
31 मे 2022 रोजी पंचायत समिती वरोरा अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायक या पदावरून फिर्यादी सेवानिवृत्त झाले होते, त्यांच्या अर्जित रजेचे सममूल्य रक्कम मिळण्यासाठी त्यांनी पंचायत समिती वरोरा येथे अर्ज केला.
मात्र सहायक लेखा अधिकारी आनंद कांबळे यांनी फिर्यादी ला बिल काढून देण्यासाठी 4 हजार रुपये मागितले, तडजोडअंती अडीच हजार रुपये देण्याचे ठरले.
मात्र फिर्यादीला पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत चंद्रपुर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.
पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले यांनी तक्रारीची पडताळणी केल्यावर सापळा रचला, 5 जानेवारी 2023 ला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वरोरा पंचायत समिती मध्ये लाचेची रक्कम स्वीकारताना आनंद कांबळे यांना अटक केली.
Acb trap
सदरची कारवाई पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, पोलीस कर्मचारी संदेश वाघमारे, रोशन चांदेकर, राकेश जांभुळकर, पुष्पा काचोळे व सतीश सिडाम यांनी यशस्वीपणे पार पाडली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने