चंद्रपूर - 11 जानेवारीला चंद्रपूर विसापूर मार्गावर देविदास बावणे हे पत्नीसह विसापूरला जात असताना एका अज्ञात दुचाकीस्वाराने बावणे यांच्या पत्नीचा पर्स हिसकावीत पळून गेला.
Maharashtra crime news
याबाबत देविदास बावणे यांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली, घटनेचे गांभीर्य लक्षात घेत गुन्हे शोध पथकाचे सपोनि हर्षल एकरे यांनी आपल्या चमुसह घटनास्थळ गाठले.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली. Chandrapur police
आरोपी 24 वर्षीय रोहित उर्फ लुई रामदेव बहुरीया रा. लालपेठ कॉलरी चंद्रपुर याला ताब्यात घेत त्याचेंजवळून चोरी गेलेला माल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी क्रमांक MH34BX9853 असा एकूण 42 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या कामी आले, त्यामुळे पोलिसांनी आरोपीला काही तासात अटक केली. त्याकरिता नागरिकांनी आपल्या घरी cctv कॅमेरे लावावे असे आवाहन चंद्रपूर रामनगर पोलिसांनी केले आहे.
सदर गुन्हा उघडकीस आणणे साठी रामनगर पोलीस ठाण्याचे सपोनि हर्षल एकरे, पोउपनी विनोद भुरले, मधुकर सामलवार, रजनीकांत पुठ्ठावार, प्रशांत शेंदरे, किशोर वैरागडे, विनोद यादव, दशरथ शेडमाके, मिलिंद दोडके, विकास जुमनाके, हिरालाल गुप्ता, विकास जाधव व भावना रामटेके यांनी परिश्रम केले.