सरत्या वर्षात ह्या हत्याकांडाने हादरला चंद्रपूर जिल्हा

सरत्या वर्षात ह्या हत्याकांडाने हादरला चंद्रपूर जिल्हा

Crime story's
चंद्रपूर - वर्ष 2022 मध्ये नोव्हेंबर महिन्यात चंद्रपूर जिल्ह्यात हादरविणारे हत्याकांड घडले होते, 10 ते 12 जणांच्या घोळक्याने महेश मेश्राम नामक युवकाची क्रूर हत्या करीत त्याचे शीर धडावेगळे केले, त्यानंतर त्याच्या शिराला पायाखाली तुडवीत आरोपीनी चक्क फुटबॉल खेळत पुढे नेले. 


वर्ष संपण्याआधी घडलेल्या या घटनेने चंद्रपूर जिल्हा हादरुन गेला होता. Brutal murder
हत्याकांड पूर्वीच चंद्रपूर जिल्ह्यात नवे पोलीस अधीक्षक रुजू झाले होते, पोलिसांनी याप्रकरणी तपासाला गती देत तब्बल 11 आरोपींना अटक केली. Chandrapur crime
महेश मेश्राम अय्यप्पा मंदिर जवळील भागात राहात होता, शिक्षणात अगदी हुशार असलेला हा युवक 2 वर्षात दुर्गापूर भागात भाई म्हणून उदयास आला. महेश हा सर्वांसोबत प्रेमाने बोलायचा मात्र दारू पिल्यावर त्याचे वाद प्रत्येक जनांसोबत व्हायचे, या करणारे महेश च्या शत्रूंच्या संख्येत मोठी वाढ झाली होती.
2 वर्षांपूर्वी एका युवकासोबत महेश चा वाद झाला त्या वादात महेश ने एकाचा कान कापला, मग काय त्याचा बदला घेण्याचे कट 2 वर्षांपासून सुरू झाले होते.
मेश्राम च्या हत्या प्रकरणातील आरोपी सुद्धा गुन्हेगारी वृत्तीचे आहे, दारू व्यवसाय व गांजा विक्री करण्यास अग्रेसर असलेले आरोपी अशी त्यांची दुर्गापूर परिसरात ओळख होती.
5 नोव्हेंबर 2022 रविवार एसटी वर्कशॉप चौकात त्याचा आरोपिसोबत वाद झाला, वादाचे रूपांतर हाणामारीत झाले, मात्र 2 दिवसांनी क्रूर हत्याकांड घडले.
Chandrapur police
7 नोव्हेंबर 2022 वेळ रात्रीची 9 वाजता, महेश हा आपल्या मित्रासोबत दुर्गापुरातील इमली बार मध्ये होता, त्यावेळी आरोपी सुद्धा बार मध्ये होते, महेश दारू पिऊन बाहेर पडला, तितक्यात महेश वर वार करण्यात आला. Mahesh meshram murder news
महेश ने प्रतिकार केला, मात्र आरोपींची संख्या जास्त होती, महेश वर रॉड ने हल्ला करण्यात आला, त्यानंतर सर्वांनी मिळून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.
महेशला आधी दगडाने ठेचले, आरोपींना वाटले महेश चा मृत्यू झाला मात्र त्यानंतर त्याच्या शरीराची हालचाल झाली, महेश वाचला तर आपण मेलो अशी भावना आरोपींच्या मनात होती.
मग धारधार शस्त्राने महेश चे शीर कापण्यात आले, शीर हातात घेत आरोपीनी पायाखाली तुडवीत फुटबॉल खेळत निघाले.
हे सर्व कृत्य 15 ते 20 मिनिटं दुर्गापुरातील मुख्य मार्गावर सुरू असताना अनेक नागरिकांनी बघितले.
चंद्रपुरात पहिल्यांदा या प्रकारे क्रूर हत्याकांड घडले. Maharashtra crime news
मेश्राम हत्याकांड प्रकरणी भागीरथी ठाकूर व शुभम मलीये या 2 मुख्य आरोपींना दुर्गापूर पोलिसांनी अटक केली. Goodbye 2022
उर्वरित आरोपी अतुल मालाजी अलिवार, दीपक नरेंद्र खोब्रागडे, सिद्धार्थ आदेश बनसोड, संदेश सुरेश चोखाद्रे, सूरज दिलीप शहारे, साहेबराव उत्तम मलीये, अजय नानाजी दुपारे, प्रमोद रामलाल सूर्यवंशी हे वर्धा जिल्ह्यात पळून जात असताना स्थानिक गुन्हे शाखेने यांच्या मुसक्या आवळल्या.
त्यानंतर 2 दिवसांनी बंडू साव या आरोपीला अटक करण्यात आली.
सरत्या वर्षात या हत्याकांडाने चंद्रपूर जिल्हा अक्षरक्षा हादरुन गेला.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने