राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्याने मागितली 20 हजार रुपयांची लाच

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्याने मागितली 20 हजार रुपयांची लाच

Crime story's
सोलापूर - दारूबंदी कलमांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपीला जामीन मिळावा यासाठी सहकार्य करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्याने 20 हजार रुपयांची लाच मागीतल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाने अटक केली. Anti corruption trap

Maharashtra crime news
मलंग गुलाब तांबोळी असे लाच मागितलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे, ऑक्टोबर 2022 मध्ये फिर्यादी यांच्यावर दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्या गुन्ह्यात जामीन मिळावा यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर चा कर्मचारी मलंग तांबोळी याने 30 हजार रुपये फिर्यादीला मागितले.
तडजोडीअंती 20 हजार रुपये देण्याचे ठरले मात्र फिर्यादीला पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी सोलापूर लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली.
लाचलुचपत विभागाने तक्रारीची पडताळणी केली, पडताळणी झाल्यावर लाचलुचपत विभागाने सापळा रचला, मलंग तांबोळी याने लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्यावर तांबोळी ला अटक करण्यात आली.
कारवाई दरम्यान तांबोळी ने लाचलुचपत विभागाच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली, या झटापटीत लाचलुचपत विभागाचा कर्मचारी जखमी झाला, जखमी कर्मचाऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
आरोपी मलंग तांबोळी यांच्यावर विजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. Acb raid
सदरची कारवाई उपाधीक्षक गणेश कुंभार, पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस नाईक प्रमोद पकाले, अतुल घाडगे, उमेश पवार, स्वप्निल सन्नके, उडाणशिव यांनी केली.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने