मुंबई/कल्याण - 7 वर्षीय मुलाच्या आईने उसने घेतलेले पैसे परत दिले नाही म्हणून 7 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
कल्याण पश्चिम येथील सुंदर रेसिडेन्सी मध्ये राहणाऱ्या कविता भोसले यांची बिल्डिंग मध्ये वॉचमॅन असलेले नितीन कांबळे सोबत मैत्री झाली होती. Mumbai crime
Maharashtra crime news
यादरम्यान दोघांमध्ये पैश्याचे व्यवहार झाले, कविता भोसले यांनी नितीन कांबळे जवळून 50 हजार रुपये घेतले होते, मात्र ते पैसे कविता यांनी न दिल्याने पैसे परत मिळावे यासाठी नितीन ने वारंवार तगादा लावला.
पण त्याला पैसे मिळाले नाही, याचा राग मनात धरून सोमवारी नितीन ने 7 वर्षीय प्रणव भोसले यांच्या शाळेत जात त्याला बिल्डिंगमध्ये आणले व गच्चीवर जात त्याला पाण्याच्या टाकीत धक्का देत निघून गेला.
प्रणव चा मृत्यू झाल्याने आरोपी नितीन घाबरला व माझे मला परत दिले नाही म्हणून त्याने फेसबुकवर सुसाईड नोट लिहत आत्महत्येचा प्रयत्न केला असा जबाब नितीन ने खडकपाडा पोलीस स्टेशनला नोंदविला. Crime murder
मात्र त्यावेळी कविता भोसले पोलीस स्टेशनमध्ये पोहचत माझा मुलगा कुठे आढळत नाही याबाबत पोलिसात तक्रार दिली.
पोलिसांना नितीन वर संशय आला पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता त्यामध्ये आरोपी नितीन हा प्रणव ला घेऊन जात होता, पोलिसांनी नितीन ची कसून चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली.
पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले व प्रणव चा मृतदेह ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला.