दारू पिण्यास मनाई केल्याने शिक्षकाने केली शिक्षिकेची हत्या

दारू पिण्यास मनाई केल्याने शिक्षकाने केली शिक्षिकेची हत्या

Crime story's
छत्तीसगड /गरियाबंद - शिक्षकाला दारूचे अतिव्यसन होते, त्याला पत्नीने दारू पिऊ न दिल्याने शिक्षिका पत्नीला ठार मारले.
शिक्षक दाम्पत्याला 1 मुलगा व 1 मुलगी आहे, घटनेच्या दिवशी दोन्ही मुले आजोबांकडे गेली होती. India crime news
teacher Killed wife in Chhattisgarh
माजरकट्टा येथे राहणारे शिक्षक डोमनकांत ध्रुव हे इंदगाव येथे शिक्षक आहे, त्यांची पत्नी मीना ध्रुव या गंजाईपुरी येथील शाळेत शिक्षिका आहे, दोघे पती-पत्नी शासकीय नोकरीवर होते. 
मात्र शिक्षक पती डोमनकांत ला दारूचे अतिव्यसन होते, 23 डिसेंम्बरला रात्रीच्या सुमारास पती पत्नीमध्ये दारू वरून वाद सुरू झाला.
पत्नीने डोमनकांत ला दारू पिण्यास मनाई केली, यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले, दारु पिऊ न दिल्याने डोमनकांत ला राग आला, त्याने रागाच्या भरात मीना च्या डोक्यावर रॉड ने वार केला.
या हल्ल्यात मीना चा जागीच मृत्यू झाला, घरात रक्ताचा सडा पडलेला होता, याबाबत आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले, हत्येबाबत आरोपी शिक्षकाने पोलिसांना हत्येबाबत कसलाही पश्चताप नसल्याचे म्हटले आहे.
Mgid?
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने