संपूर्ण चेहऱ्याला त्या विद्यार्थिनीने लिपस्टिक लावले आणि.....

संपूर्ण चेहऱ्याला त्या विद्यार्थिनीने लिपस्टिक लावले आणि.....

Crime story's
नागपूर - Neet परीक्षेची तयारी करणाऱ्या 18 वर्षीय मुलीने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. 

बेलतरोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे, 18 वर्षीय सानिका प्रवीण लाजूरकर असे मृतक युवतीचे नाव आहे. Nagpur crime
पृथ्वी राजनगर येथील शिव हाईट्स येथे सदर मुलगी भाड्याने राहत होती, नागपुरात ती Neet परीक्षेची तयारी करीत होती.
सानिकाचे वडील व आई हे वर्धा येथे राहतात, मुलीचे शिक्षण व्यवस्थित व्हावे यासाठी तिला नागपूर येथे पाठविण्यात आले होते.
सकाळी ती शिकवणी वर्गाला गेली नाही, maharashtra crime news शिक्षकाने याबाबत सानिकाच्या वडिलांना माहिती दिली, पालकांनी सानिकाला सम्पर्क केला असता त्यांना काही प्रतिसाद मिळाला नाही.
त्यामुळे सानिकाचे आई-वडील तात्काळ नागपुरात पोहचले, फ्लॅट मध्ये गेल्यावर त्यांनी दरवाजा ठोठावला मात्र काही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी दरवाजा तोडला व आत प्रवेश केला असता सानिका गळफास घेतल्याचा अवस्थेत होती.
सानिकाच्या मृतदेहाजवळ पोलिसांना सुसाईड नोट आढळली त्यामध्ये "मी त्रस्त आहे, त्यामुळे आत्महत्या करीत आहे" असे इंग्रजी मध्ये लिहले होते.
पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करीत तपास सुरू केला आहे.
विशेष म्हणजे सानिका ने आत्महत्या करण्यापूर्वी संपूर्ण चेहऱ्याला लिपस्टिक लावली, त्यानंतर तिने गळफास घेत स्वतःला संपविले.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने