चंद्रपूर जिल्ह्यात सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला तलाठ्याने मागितली लाच

चंद्रपूर जिल्ह्यात सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला तलाठ्याने मागितली लाच

Crime story's
चंद्रपूर - सध्या जिल्ह्यात शासकीय सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लाच घेण्याचा सपाटा सुरू ठेवला आहे, मात्र लाचलुचपत विभागाच्या भीतीने लाच कार्यालयात न घेता दुसऱ्या ठिकाणी घेण्याचे काम सुरू आहे.

Bribery
असाच एक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा येथे घडला, सेवानिवृत्त कर्मचारी व इतर दोघांनी मिळून दिघोरी, पोंभुर्णा येथे शेत विकत घेतले होते, त्या सामूहिक शेतजमिनीचे फेरफार करीत वेगळा सातबारा व नकाशा दुरुस्ती फिर्यादी यांना करायचे होते. Bribe
मात्र त्या कामाकरिता घोसरी येथील तलाठी दिलीप रामचंद्र मोरे यांनी फिर्यादी ला 3 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली, पैसे दिल्यास काम लवकर करून मिळेल अशी हमी तलाठी मोरे यांनी फिर्यादी यांना दिली. 
तडजोडीअंती 2 हजार रुपये देण्याचे ठरले, मात्र यापूर्वी फिर्यादी यांनी याबाबत चंद्रपूर लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदविली. Maharashtra crime news
तक्रारीची पूर्णपणे पडताळणी करीत पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे यांनी सापळा रचला, पोंभुर्णा येथील किरायाच्या रूम मध्ये मोरे यांनी 2 हजार रुपये स्वीकारले. Chandrapur bribe news
त्यावेळी लाचलुचपत विभागाच्या चमूने तलाठी मोरे यांना रंगेहात अटक केली. आरोपी तलाठी मोरे यांना ताब्यात घेत पुढील तपास सुरू आहे.
सदरची यशस्वी कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल माकनिकर, अप्पर पोलीस अधीक्षक मधुकर गीते, पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे, पोउपनी रमेश दुपारे, पोलीस कर्मचारी नरेश नन्नावरे, संदेश वाघमारे, रविकुमार ढेंगळे, सतीश सिडाम यांनी पार पाडली. 
जिल्ह्यात कुठेही शासकीय सेवेत असणाऱ्या कर्मचारी/अधिकारी यांनी काम करण्यासाठी पैश्याची मागणी केल्यास तात्काळ याबाबत चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग क्रमांक 07172-250251यावर सम्पर्क करण्याचे आवाहन चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने