देवगिरी एक्स्प्रेस मध्ये दरोडा

देवगिरी एक्स्प्रेस मध्ये दरोडा

Crime story's
डोंबिवली - मुंबई कडे जाणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेस मध्ये दरोडेखोरांनी लूट च्या उद्देशाने प्रवेश करीत तब्बल 11 प्रवाश्यांना हत्यारांचा धाक दाखवून लुटले मात्र यावेळी एक्स्प्रेस मध्ये प्रवास करणाऱ्या पत्रकाराने सतर्कता दाखवीत दरोडेखोरांना पोलिसांच्या ताब्यात दिले. Maharashtra crime news


कसारा ते कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान देवगिरी एक्स्प्रेस मध्ये 8 दरोडेखोरांनी अचानक प्रवेश करीत उच्छाद मांडला, तीक्ष्ण हत्यार हातात घेत त्यांनी 11 प्रवाश्यांना लुटले, काही प्रवाश्यांना दरोडेखोरांनी बेदम मारहाण सुद्धा केली. India crime
मंगळवारी पहाटे अचानक घडलेल्या या प्रकाराने काही वेळासाठी प्रवासी सुद्धा घाबरले होते, मात्र त्या एक्स्प्रेस मध्ये प्रवास करीत असलेल्या पत्रकाराने सतर्कता दाखवीत तात्काळ लोहमार्ग पोलिसांना माहिती दिली. Devgiri express
पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकात 6 दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या.
आरोपी हे 19 ते 26 वर्षे वयोगटातील आहे, यामध्ये 2 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. 
सर्व दरोडेखोर हे औरंगाबाद येथील निवासी आहे.
रोहित जाधव, विलास लांडगे, कपिल उर्फ प्रकाश निकम, करण वाहने, राहुल राठोड, निलेश चव्हाण अशी आरोपींची नावे आहेत तर दोन अल्पवयीन मुलांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने