चंद्रपूर जिल्ह्यात शेतात काम करणाऱ्या महिलेवर बलात्कार

चंद्रपूर जिल्ह्यात शेतात काम करणाऱ्या महिलेवर बलात्कार

Crime story's
वरोरा / शेगाव - राज्यात सध्या महिला अत्याचाराच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, असाच एक संतापजनक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील शेगाव येथे उघडकीस आला. Chandrapur crime
20 डिसेंम्बरला सायंकाळी 5 वाजेदरम्यान चारगाव बुज वरोरा येथील शेतात एक 45 वर्षीय महिला पाईप गोळा करीत असताना एकाने तिच्यावर जबरदस्ती करीत बलात्कार केला.
सदर महिला ही आरोपी देवानंद मधुकर मसराम यांच्या शेतात पाईप गोळा करायला आली होती, याची संधी साधून मसराम यांनी त्या महिलेला जमिनीवर पाडत तिच्यावर अत्याचार केला, त्यावेळी पीडितेचे पती त्याठिकाणी पोहचत आरोपी मसराम ला ओढत चोप दिला.
याबाबत पोलीस स्टेशन शेगाव बु येथे पीडित महिलेने घडलेल्या अत्याचाराबाबत तक्रार नोंदवली.
पोलिसांनी आरोपी मसराम वर कलम 376 अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करीत अटक केली.
पुढील तपास पोलीस निरीक्षक अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनी प्रवीण जाधव करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने