राष्ट्रवादी कांग्रेसच्या आदिवासी विकास सेलच्या प्रदेश अध्यक्षाला 3 वर्षाची शिक्षा

राष्ट्रवादी कांग्रेसच्या आदिवासी विकास सेलच्या प्रदेश अध्यक्षाला 3 वर्षाची शिक्षा

Crime story's
यवतमाळ - कायद्यासमोर कुणीही मोठा नाही, असाच एक निकाल पांढरकवडा सत्र न्यायालयाने दिला आहे, राष्ट्रवादी कांग्रेसचे आदिवासी विकास सेलचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार राजू तोडसाम यांना शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याचा ठपका ठेवत 3 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली.
Yavatmal crime
न्यायालयाच्या या निकालाने यवतमाळ जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.
29 नोव्हेंबर 2013 रोजी पांढरकवडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाची तोडफोड व जाळपोळ प्रकरणी न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. Ex-mla ncp
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनात तब्बल 3 लाख 61 हजार रुपये किमतीच्या साहित्याचे नुकसान व 1 लाख 12 हजार रुपयांचे सामान चोरून नेले होते. Maharashtra crime news

या सोबतच बाजार समितीत असलेल्या राष्ट्रध्वजही जाळण्यात आल्याची तक्रार पांढरकवडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पांढरकवडा पोलीस ठाण्याच्या तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक राखी गेडाम यांनी या प्रकरणाची चौकशी केली.

चौकशीअंती पांढरकवडा पोलीस ठाण्यात आरोपींवर भादवि कलम १४३,१४७,१४८,४३५,४३६,३७९,४५० सहकलम १४९, कलम १३५ मुंबई पोलीस ऍक्ट, सहकलम १४९, शासकीय मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कलम कलम ३, ४ अन्वये गुन्हा दाखल करून हे प्रकरण पांढरकवडा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायप्रविष्ठ करण्यात आले होते.

पांढरकवडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाची तोडफोड व जाळपोळ प्रकरणी माजी आमदार राजू नारायण तोडसाम यांच्यासह नंदकिशोर पांडुरंग पंडित, विकेश विठ्ठल देशट्टीवार, किशोर हरिभाऊ घाटोळ, सुधीर माधवराव ठाकरे, नारायण बाबाराव भानारकर या सहा आरोपींना येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी बी नाईकवाड यांनी तीन वर्षे सक्त मजुरी आणि 12 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावलीय.

आरोपी गिरीश केशवराव वैद्य, संजय पुरुषोत्तम वर्मा, सुभाष कर्णजी दरणे आणि सुनील बालाजी बोकीलवार यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने