महाराष्ट्र-तेलंगाणा सीमेवर रंगला लाखोंचा जुगार

महाराष्ट्र-तेलंगाणा सीमेवर रंगला लाखोंचा जुगार

Crime story's
नांदेड - महाराष्ट्र-तेलंगाणा सीमेवर जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती भोकर पोलिसांना मिळाली होती, माहितीच्या आधारे पोलिसांनी सीमेवर मागील अनेक दिवसांपासून बंद असलेल्या किनी गावातील लक्ष्मी नृसिंह राईस मिल मध्ये धाड मारली असता तिथे 17 जणांना अटक करीत तब्बल 16 लाख 82 हजार 770 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. Gambling
या धाडीत महाराष्ट्र व तेलंगाणा राज्यातील अनेक प्रतिष्ठित जुगारी पोलिसांच्या हाती लागले आहे, सदर राईस मिल ही अनेक महिन्यापासून बंद अवस्थेत होती, त्याठिकाणी जुगार शौकिनानी जुगार क्लब बनवीत तिथे दररोज लाखोंचा जुगार खेळण्याचे काम सुरू केले.
मात्र याबाबत पोलिसांना माहिती मिळाली, भोकर पोलीस निरीक्षक विकास पाटील, पोउपनी अनिल कांबळे, पोउपनी दिगंबर पाटील, प्रल्हाद बाचेवाड, ज्ञानेश्वर सरोदे, विकास राठोड व सीमा वच्छेवार यांनी सापळा रचत त्या राईस मिल मध्ये छापामार कारवाई केली. Maharashtra crime news
या कारवाई पोलिसांना रोख 1 लाख 600 रुपये, 16 मोबाईल, 7 दुचाकी सहित 1 चारचाकी वाहन, जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण 16 लाख 82 हजार 770 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. Gamblers


या कारवाईत जुगारी संजीव रेड्डी, संतोष खलसे, गणेश कदम, श्रीनिवास जाधव, राजकुमार बलीजापल्ली, आनंद राठोड, अंकाम, मल्लेश नारडे, बालाजी घोसालवाड, विठ्ठल गोपवाड, देविदास येनकुसाब, गजराज पळसे, सत्यनारायण शिंदे, सुरेश ठाकूर, श्रीनिवास कदम, गोविंद जाधव, दिलीप जाधव या आरोपींना अटक करण्यात आली आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने