चंद्रपूरचा खुशाल सुगंधित तंबाखू आणण्यासाठी पोहचला तेलंगाणा राज्यात

चंद्रपूरचा खुशाल सुगंधित तंबाखू आणण्यासाठी पोहचला तेलंगाणा राज्यात

Crime story's
चंद्रपूर/विरुर - वर्ष 2012 पासून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखूची तस्करी आजही अविरतपणे सुरू आहे. Chandrapur crime
चंद्रपूर जिल्ह्यात मागील 10 वर्षांमध्ये तंबाखू तस्करीचा वाढता आलेख असून आजही मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू तस्करीचा व्यापार सुरू आहे, पोलिसांनी अनेकदा कारवाई करून सुद्धा ही तस्करी थांबण्याचे नाव घेत नाही आहे. Maharashtra crime news
चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर लागून असलेले विरुर येथे पोलिसांनी सुगंधित तंबाखू तस्करी करणाऱ्याला अटक केली आहे.
विरुर वरून तेलंगाणा राज्य लागून असल्याने तिथून सुगंधित तंबाखू चंद्रपूर जिल्ह्याचे आणण्याचे काम सुरू आहे.

28 डिसेंम्बरला तेलंगाणा येथील सिरपुर मधून चंद्रपुरातील श्यामनगर येथे राहणारा खुशाल नानाजी चंदनखेडे चंद्रपुरात सुगंधित तंबाखूची तस्करी करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. Tobacco's smuggling
माहितीच्या आधारे विरुर पोलिसांनी डोंगरगाव येथे नाकाबंदी करून संशयित मोपेड चालकास थांबवित त्याची झडती घेण्यात आली, मोपेड क्रमांक MH34CC3704 ची झडती घेतल्यावर त्यामध्ये सुगंधित तंबाखू हुक्का ईगल चे 70 डब्बे, 200 ग्राम चे 46 पॉकेट एकूण किंमत 32 हजार 90 रुपयांच्या मालासाहित 92 हजार 90 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपीला ताब्यात घेत सदर प्रकरणाची माहिती अन्न व औषध विभागाला देण्यात आली.
आरोपी खुशाल चंदनखेडे वर अन्न व सुरक्षा मानके कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला, पुढील तपास विरुर चे ठाणेदार जयप्रकाश निर्मल करीत आहे. 
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, पोलीस उपविभागीय अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली विरुर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक जयप्रकाश निर्मल यांच्या नेतृत्वात प्रवीण उमप अन्न व सुरक्षा अधिकारी, पोलीस कर्मचारी माणिक वागदरकर, विजय मुंडे, अतुल शहारे, सुरेंद्र काळे, विजय तलांडे, प्रमोद मिलमिले व सचिन थेरे यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने