घरात मुलीचे लग्न अन आई प्रियकरासोबत पळाली

घरात मुलीचे लग्न अन आई प्रियकरासोबत पळाली

Crime story's
उत्तराखंड - 14 डिसेंम्बरला घरात मोठ्या मुलीचे लग्न मात्र त्याआधी मुलीची आई घरातील दागिने घेऊन प्रियकरासोबत पसार झाली.

कोतवाली परिसरात राहणाऱ्या 38 वर्षीय महिलेच्या मोठ्या मुलीचे लग्न 14 डिसेंम्बरला होते, घरात पाहुण्यांची लगबग सुरू झाली, लग्नाची खरेदी सुद्धा झाली, दागदागिने घरी आणण्यात आले. Uttarakhand crime
मात्र त्याआधीच सदर घटना घडल्याने आता मुलीच्या लग्नाचे काय होणार? यावर मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. Love affair
महिलेच्या पतीचे वर्षभराआधी निधन झाले होते, त्या महिलेला 4 मुले आहे, मोठ्या मुलीचे लग्न असल्याने घरात आनंदाचे वातावरण होते.
मात्र शनिवारी रात्री महिला आपल्या प्रियकरासोबत रक्कम व दागिने घेऊन पळाली.
पाहुणे मंडळींना त्या महिलेच्या प्रियकराबाबत माहिती मिळाली त्याचा शोध घेतला असता तो घरी नसल्याचे कळले. India crime news
पाहुण्यांनी या संदर्भात पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली, मंगलोर कोतवालीचे ठाणेदार राजीव रौथाण यांनी याबाबत माहिती दिली की शनिवारी महिला आपल्या प्रियकरासोबत घरातील दागिने घेऊन पळाली, ती महिला व प्रियकर दोघेही एकाच ठिकाणी काम करीत होते, त्यांनी पळून जात एकमेकांशी लग्न केल्याची शंका पोलिसांना आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने