अवैध धंद्यांच्या महापुरात त्रिमूर्ती चा डंका

अवैध धंद्यांच्या महापुरात त्रिमूर्ती चा डंका

Crime story's
चंद्रपूर जिल्ह्ातील कोरपना तालुका हा आदिवासी बहुल क्षेत्र समजल्या जातो टोकावर असलेला हा भाग तेलंगणा राज्य ला लागुन आहे. त्यामुळे सीमावर्ती रेलचेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसते.विशेष बाब म्हणजे या ठिकाणी तालुक्यात मोठे सिमेंट उद्योग आणि शेजारी कोळसा खानी आहे. Maharashtra crime news

त्यामुळे ट्रान्सपोर्ट मोठ्या प्रमाणात या ठिकाणीं सुरू असते. विशेष बाब म्हणजे कोरपना पोलिस स्टेशन जेव्हा पासुन उदयास आले तेव्हा पासून या ठिकाणी पोलिस निरीक्षक दर्जा च्या व्यक्तिनेच हे पोलिस स्टेशन हाताळले आहे. मात्र जिल्ह्यात सक्षम अधिकारी असताना देखील तत्कालीन पोलिस अधिक्षक अरविंद साळवे यांनी गुरणुले या थानेदाराची तडकाफडकी रिटायरमेंट असताना सुद्धा कंट्रोल रूम ला बसवत एपीआय सदाशिव ढाकणे यांची वर्णी लावली. विशेष म्हणजे अनेक पोलिस निरीक्षक दर्जा चे अधिकारी असताना असे कोणते गौडबंगाल झाले की अचानक यांची वर्णी लावण्यात आली याची खमंग चर्चा ही पोलिस खात्यात झाली. कोरपना तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध कारोबार जसे दारू, मटका, सुगंधित तंबाखू, अवैध तांदूळ,रेती तस्करी, सरेआम गेल्या वर्ष भरापासून या ठिकाणी सुरू होते.
Chandrapur police
उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक हे नेहमी या ठिकाणी सुरू असलेल्या अवैध धंद्यावर धाड मारीत कारवाई करतच होते. मात्र कोरपना पोलिस स्टेशन हे मुग गिळून गप्प बसत होते?वणसडी, कोरपना, पारसोडा , नारांडा, टीपा, कोळसी घाट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध व्यापार सुरू होते आणि लाखो ची वसुली या मार्फत केली जात होती? विशेष म्हणजे वेग वेगळया व्यवसाय साठी विशेष वसुली कर्मी ची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे.ट्रान्स पोर्ट साठी तीन व्यक्ती हे महिण्याकाठी लाखोंची एन्ट्री जमा करतात. प्रभा, बल आणि नाम चे हे विशेष त्रिमूर्ती पथक आपल्याला नेहमीच कोरपना तालुक्याच्या हद्दीत दिसतील. सुगंधित तंबाखू आणि अवैध तांदूळ साठी गणेश,आणि दारू मटका साठी जुन्या व्यक्ती कडे च जवाबदारी दिली असल्याचे विदारक चित्र या ठिकाणी दिसत आहे? गेल्या महिन्याभरापासून स्वतः उपविभागीय पोलिस अधिकारी सुशील कुमार नायक स्वतः धाड सत्र राबवत असून या अवैध कारोबार वर अंकुश आणले आहे.त्यामुळे पोलिस स्टेशन कर्मचारी आणि अधिकारी यांना चांगलीच धास्ती बसली आहे. गेल्या आठवडयात उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी स्वतः प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखू विक्रेत्यांना कोरपना पोलिस स्टेशन च्या हद्दीत लाखो चा माल पकडीत कारवाई केली.या वेळेस अनेक धक्कादायक खुलासे ही झाले महिण्यकाठी लाखो ची माया ह्या धंद्यात तून समंधीत अधिकारी गणेश नावाच्या व्यक्ती कडून घेत होता?..त्यामुळे त्या अधिकाऱ्याची चांगलीच फजितीही झाली होती थातुर माथूर कारवाई करायच्या आणि आपला उल्लू साधायचा असे धोरण या कोरपना मध्ये केले आहे. या सर्वाचा संपूर्ण पाढा विशेष पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोर्जे यांच्या समोर ठेवल्या जाणार असल्या चे बोलल्या जात असल्याचे गुप्त सूत्रांनी सांगितले आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने