चंद्रपुरातील जटपुरा गेटवर भीषण अपघात, 2 गंभीर जखमी

चंद्रपुरातील जटपुरा गेटवर भीषण अपघात, 2 गंभीर जखमी

Crime story's
चंद्रपूर - 16 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने कलम 37 (1) व (3) लागू करण्यात आली आहे. Chandrapur horrible accident




मात्र या कालावधीत गुन्हेगारी जोरात फोफावत आहे, चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट परिसरात 17 डिसेंम्बर च्या रात्री 11.30 वाजता चारचाकी वाहनाने रस्त्यावर उभ्या असलेल्या युवकांना जोरदार धडक मारली. Jatpura gate accident
या धडकेत 2 युवक गंभीर जखमी झाले आहे, चारचाकी वाहन क्रमांक MH33V1999 मध्ये जटपुरा वार्ड येथे राहणारे विनीत तावाडे व शाहिद काजी व अन्य होते, विशेष म्हणजे धावत्या वाहनात हे लोक दारू पीत होते, नशा चढल्यावर यांच्या वाहनाचा वेग सुसाट झाला, जटपुरा गेट वरून रामनगर मार्गावर जात असताना इटनकर पान ठेल्या जवळ काही युवक आपल्या दुचाकी वाहनावर बसून होते, मात्र त्या युवकांना मागून भरधाव वेगात मृत्यू येत असल्याची कल्पना नव्हती. Drunk & drive
काही वेळात ते चारचाकी वाहनाने दुचाकीवर बसलेल्या युवकांना जोरात धडक दिली, धडक इतकी जोरदार होती की एक युवक या धडकेत हवेत उडाला.
अचानक झालेला अपघात व परिसरात आलेला जोरदार आवाजाने नागरिक त्या दिशेने धावले, चारचाकी वाहनाचा चुराडा झाला, त्या वाहनात दारूची व पाण्याची बॉटल आढळली.
पण अपघातामध्ये 15 वर्षीय ऋषी बंडू ढोले याला गंभीर दुखापत झाली तर 16 वर्षीय ओम संतोष इटनकर हा गंभीर जखमी झाला.अपघातानंतर जटपुरा गेट परिसर अक्षरशः हादरुन गेला होता. सध्या ऋषी ढोल याची मृत्यूशी झुंज सुरू आहे.
पोलिसांनी चारचाकी वाहनात मद्यधुंद अवस्थेत असलेल्या युवकांना ताब्यात घेतले. Maharashtra crime news
या अपघाताला जबाबदार कोण असेल? हा प्रश्न रात्री अनेक नागरिकांच्या मनात फिरत होता, शहरात अनेक दुकानं चालक पोलिसांना जुमानत नाही, जटपुरा गेट वर मध्यरात्री पर्यंत सुरू असलेले पान ठेले व्यवसायिक पोलिसांचं काहीच ऐकत नाही, या व्यवसायिकविरोधात अनेकदा नागरिकांनी पोलिसांना तक्रार सुद्धा दिली होती, तरी हे पान ठेले धारक छुप्या पध्द्तीने सुरू असतात. Chandrapur police
शहरातील जटपुरा गेट परिसरात इटनकर पान ठेला, जलनगर रेल्वे स्टेशनवर, जिल्हाधिकारी कार्यालय समोर असलेला पान ठेला मध्यरात्री नंतर सुद्धा सुरूच असतो, यांना प्रशासनाने काही विशेष सूट दिली आहे की काय? असा प्रश्न अनेक नागरिक विचारत असतात. Accident live video
या मुजोर व्यावसायिकांवर नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी व अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु कारवाई करणार काय? याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
हे व्यवसायिक कायद्यापेक्षा मोठे नाही हे दाखविण्याची वेळ आता पोलिसांना मिळालेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने