200 किलोमीटर अंतर गाठत त्याने केली पत्नीची हत्या

200 किलोमीटर अंतर गाठत त्याने केली पत्नीची हत्या

Crime storys
गुजरात - पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत संतापलेल्या पतीने पत्नीची हत्या करण्यासाठी तब्बल 200 किलोमीटर अंतर कापत तिची धारदार शस्त्राने हत्या केली. Gujrat crime
सुरत मध्ये प्रवश्याने भरलेल्या बस मध्ये सदर प्रकार घडल्याने प्रवासी सुद्धा या घटनेमुळे घाबरले होते.
पत्नीची हत्या केल्यावर आरोपी मृतदेहाजवळ बसून होता, प्रवाश्यानी याबाबत पोलिसांना माहिती दिली असता आरोपी पतीला अटक केली.
अमृत रथवा हा शिपाई म्हणून कार्यरत होता तर त्याची पत्नी मंगुबेन रथवा गुजरात राज्य रस्ते वाहतूक महामंडळात वाहक म्हणून कार्यरत होती. India crime news
21 डिसेंम्बरला पती-पत्नी एकाचवेळी कामाला जाण्यासाठी बाहेर निघाले होते, पत्नीची बस भिखापुर गावाजवळ पोहचताच, अमृत 200 किलोमीटर अंतर कापत पत्नीच्या बस मध्ये चढला, मनात संशयाचा संताप असलेल्या पतीने प्रवासी भरलेल्या बस मध्येच धारदार शस्त्र काढत तिचा गळा चिरला, अचानक झालेला हा प्रकार बघून प्रवासी घाबरले. 

बस च्या आत रक्ताचा सडा पडला होता, पत्नीचा गळा चिरल्यावर त्याचा राग शांत झाला नव्हता त्याने पुन्हा तिच्या शरीरावर वार केले, पळून न जाता तो मृतदेहाजवळ बसून राहिला.
याबाबत प्रवाश्यानी पोलिसांना माहिती दिली, पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होत आरोपी अमृत ला अटक केली.
मृतदेह शवविच्छेदन साठी पाठविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने