नागपुरात गोळीबार

नागपुरात गोळीबार

Crime story's
नागपूर - नागपूर वेकोलीच्या कन्हान येथील कोळसा खाण क्रमांक 6 मध्ये कर्तव्यावर असलेल्या वेकोलीच्या सुरक्षा रक्षकावर गोळीबार करण्यात आला, सदर घटना रविवारी सायंकाळी 4 वाजताच्या दरम्यान घडली. 
nagpur crime
अकोला येथील 29 वर्षीय मिलिंद खोब्रागडे हा MSPL मध्ये खासगी एजन्सीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो, रविवारी तो चेक पोस्टवर कार्यरत असताना सायंकाळी अज्ञात युवक मोटारसायकल वर आले असता त्यांनी मिलिंद वर गोळी झाडली. Firing in Nagpur
या गोळीबारात मिलिंद जखमी झाला, त्याला तात्काळ कन्हान शहरातील वेकोलीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्याठिकाणी प्रथमोपचार केल्यावर त्याला कामठी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
मिलिंद ला 2 गोळ्या पोटात तर 1 गोळी डोक्याला लागली असल्याची माहिती आहे. Maharashtra crime news
गोळीबारातील 1 आरोपी हा आधी मिलिटरी मध्ये कार्यरत होता, त्याच्यावर कोर्ट मार्शल ची कारवाई झाल्याने नोकरी गेली, नोकरी गेल्यावर तो मूळगावी रहायला आला होता. Firing in wcl
सदर प्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे, आरोपी हे दुसऱ्या सुरक्षा रक्षकावर गोळीबार करण्यासाठी आले होते मात्र मिलिंद मध्ये आला तो जखमी झाला असे आरोपीनी पोलिसांना सांगितले आहे.



टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने